1 / 8धावपळीच्या या युगात वेळेच नियोजन करणं सर्वात मोठं आव्हान असतं, विशेषत: गृहिणींसाठी. सकाळचा डबा असो किंवा रात्रीचे जेवण, स्वयंपाकघरात तासनतास उभं राहून काम केल्याने फक्त थकवा येत नाही तर आपल्या इतर कामांकडे देखील दुर्लक्ष होते. (quick cooking tips)2 / 8स्वयंपाक करताना काही स्मार्ट ट्रिक्स वापरल्या तर पदार्थ झटपटही होतो आणि आरामही मिळतो. (easy cooking hacks)3 / 8भात शिजवताना तो चिकट झाला तर त्यात लिंबाचा तुकडा घाला. ज्यामुळे तो मऊ आणि मोकळा होतो. 4 / 8जळलेली कढई स्वच्छ करण्यासाठी त्यात व्हिनेगर आणि मीठ घाला. १० मिनिटानंतर घासा, कढई चमकण्यास मदत होईल. 5 / 8आले-लसूणची पेस्ट करण्यासाठी त्यात मोहरीचे तेल घाला, रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. रंग आणि चव दोन्ही आठड्याभरापर्यंत टिकतील. 6 / 8सकाळच्या वेळी कडधान्ये शिजवणं वेळखाऊचं काम असतं. अशावेळी आठवड्याभराचे कडधान्य उकडून त्याचे भाग करा आणि फ्रीजरमध्ये साठवा. 7 / 8आपण कांदा-टोमॅटोचे वाटण आधीच फ्रीजमध्ये ठेवले तर कोणतीही रस्सा भाजी अवघ्या १० मिनिटांत होऊ शकते. 8 / 8भाज्या शिजवण्यासाठी कुकरचा वापर केल्यास गॅसची आणि वेळेची बचत होते. डाळ आणि तांदूळ एकाच वेळी कुकरच्या वेगवेगळ्या डब्यात लावले तर वेळ अर्ध्यावर येतो.