Join us

paper bag day 2025 : पाहा सुंदर कागदी पिशव्या, प्लास्टिक बॅगचा घरोघरचा डोंगर आता करा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2025 14:48 IST

1 / 10
प्लास्टिकचा अतिरेक पर्यावरणासाठी किती हानिकारक आहे हे आपण आता पाहतोच आहोत.. पण तरीही आपल्या हातातली प्लास्टिकची बॅग काही सुटत नाही.
2 / 10
मध्यंतरी प्लास्टिक पिशव्यांना सक्त विरोध झाला आणि कागदी पिशव्या, कापडी पिशव्या पुन्हा दिसू लागल्या. या पुन्हा नव्याने आलेल्या कागदी पिशव्या खूप जुन्या आहेत बरं का..
3 / 10
१८५२ साली अमेरिकेतील शिक्षक फ्रान्सिस वोल्ले यांनी पेपरबॅगची निर्मिती करणारे मशिन तयार केले.
4 / 10
पर्यावरणासाठी पुरक असणाऱ्या कागदी पिशव्यांचे महत्त्व सगळ्यांना समजावे यासाठी १२ जुलै हा दिवस Paper Bag Day म्हणून ओळखला जातो.
5 / 10
आता तर पेपर बॅग अशा कित्येक वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत.
6 / 10
आपल्याकडे आलेल्या बॅग थोड्या जपून, सांभाळून वापरल्या तर त्या नक्कीच भरपूर दिवस टिकू शकतात.
7 / 10
अशा काही प्रकारच्या बॅग घरच्याघरी तयार करायलाही अगदी सोप्या आहेत.
8 / 10
लहान मुलांना सुटीमध्ये या बॅग तयार करायला शिकवलं तर त्यांचा छान वेळही जाईल आणि त्यांच्याकडून काही कलात्मक तयार होईल.
9 / 10
लहान मुलांच्या वाढदिवसाला रिटर्न गिफ्ट दिलं जातं. ते जर अशा बॅगमध्ये घालून दिलं तर लहान मुलांपासूनच मुलांना कागदी पिशव्या वापरण्याची सवय लागू शकते.
10 / 10
टॅग्स : सोशल व्हायरलखरेदी