आता बजेटमध्ये घर सजवणे झाले सोपे... घरातीलच वस्तू वापरून घराला द्या नवीन लूक... पाहा नक्की काय करता येऊ शकत...

Published:December 30, 2022 03:48 PM2022-12-30T15:48:15+5:302022-12-30T16:33:42+5:30

Reuse Old Items To Give Your House A Magical Makeover : जुन्या टाकाऊ वस्तू वापरून अनेक शोभेच्या वस्तू तयार करून घराच्या सौंदर्यात भर घालता येते.

आता बजेटमध्ये घर सजवणे झाले सोपे... घरातीलच वस्तू वापरून घराला द्या नवीन लूक... पाहा नक्की काय करता येऊ शकत...

घर सजवायला, घराचा मेकओव्हर करायला कुणाला नाही आवडत? प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार आणि बजेटनुसार घर सजवण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येकवेळीच घर सजवण्यासाठी खूप महागड्या वस्तू किंवा शोपीस घेण्याची गरज नसते. आपल्या घरात बर्‍याच जुन्या आणि निरुपयोगी गोष्टी असतात. त्यांच्याकडे आपण नेहमी दुर्लक्ष करतो आणि शेवटी स्टोअर किंवा कपाटात बराच वेळ पडून राहिल्यानंतर फेकून देतो. अशा वस्तू वापरुन तुम्ही घराला एक वेगळा लूक देवू शकता. घरात अशा काही टाकाऊ गोष्टी असतात ज्या थोड्याशा बदलल्या जाऊ शकतात किंवा काही सुंदर गोष्टी तयार केल्या जाऊ शकतात(Reuse Old Items To Give Your House A Magical Makeover).

आता बजेटमध्ये घर सजवणे झाले सोपे... घरातीलच वस्तू वापरून घराला द्या नवीन लूक... पाहा नक्की काय करता येऊ शकत...

अनेकदा तुमच्या घरात न वापरायच्या साड्यांचा ढीग असतो, ज्यांचा तुम्हाला वापरून कंटाळा आलेला असतो किंवा त्यात छिद्र पडलेली असतात. अशा साड्या तुम्ही कुणालाही देऊ शकत नाही आणि स्वतःही वापरू शकत नाही. अशा साड्या कापून तुम्ही सुंदर कुशन कव्हर्स तयार करु शकता. ज्यामुळे तुमच्या घराला वेगळी थीम मिळेल. तुम्ही फक्त एकाच साडीने संपूर्ण सेट तयार करु शकता. तुम्ही वेगवेगळ्या साड्याही वापरू शकता. याशिवाय भारी साड्यांची बॉर्डर तुम्ही पडद्यावर पॅच किंवा बॉर्डर म्हणून लावू शकता.

आता बजेटमध्ये घर सजवणे झाले सोपे... घरातीलच वस्तू वापरून घराला द्या नवीन लूक... पाहा नक्की काय करता येऊ शकत...

डेनिम फॅब्रिक खूप जाड आणि टिकाऊ असते. यामुळे या डेनिम्स कितीही वापरल्या तरी त्यांचे कापड फाटत नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही त्यांचा वापर करून तुमच्या घराचे सौंदर्य वाढवू शकता. या डेनिम्सपासून किचनमध्ये वापरता येईल असे एप्रन तयार करू शकता. जीन्सच्या खिशांचा वापर करून तुम्ही मुलांची लहान खेळणी किंवा त्यांची स्टेशनरी ठेवण्यासाठी होल्डर्स तयार करु शकता.

आता बजेटमध्ये घर सजवणे झाले सोपे... घरातीलच वस्तू वापरून घराला द्या नवीन लूक... पाहा नक्की काय करता येऊ शकत...

कपसेटमधील एखादा कप किंवा बशी जरी फुटली तरी त्या अपुऱ्या कपसेटचा काहीच उपयोग होत नाही. अपूर्ण सेटमध्ये तुम्ही पाहुण्यांना चहा देऊ शकत नाही. अशावेळी आपण या कप आणि कॉफी मगमध्ये इनडोअर रोपे लावू शकता. त्यांना बुक शेल्फ, सेंटर टेबल आणि डायनिंग टेबलवर ठेवून घराची शोभा वाढवू शकता.

आता बजेटमध्ये घर सजवणे झाले सोपे... घरातीलच वस्तू वापरून घराला द्या नवीन लूक... पाहा नक्की काय करता येऊ शकत...

जॅम, सॉस आणि लोणच्याच्या रिकाम्या बाटल्या आणि बरण्या घरात तशाच पडून राहतात. या बाटल्यांवरील आवरणे किंवा लेबल काढून त्यांना स्वच्छ धुवून वाळवून घ्या. मग त्यात छोट्या - छोट्या दिव्यांच्या फेयरी लाइट्स भरा. तुमच्या लिव्हिंग रूममध्ये किंवा बेडरूममध्ये रात्री दिवे म्हणून त्यांचा वापर करा.

आता बजेटमध्ये घर सजवणे झाले सोपे... घरातीलच वस्तू वापरून घराला द्या नवीन लूक... पाहा नक्की काय करता येऊ शकत...

तुमच्या गाडीचा टायर पंक्चर झाला असेल आणि तो दुरुस्त करून घेण्यास वाव नसेल तर स्वच्छ करून चमकदार रंगात रंगवा. मग त्यात गोल गाद्या ठेवून ते बसण्यासाठी तयार करु शकता. याचप्रमाणे तुमच्या गार्डनमध्ये हे टायर ठेवून त्यात माती भरून एखादं रोपटं लावू शकता. यामुळे तुमच्या गार्डनची शोभा वाढेल.

आता बजेटमध्ये घर सजवणे झाले सोपे... घरातीलच वस्तू वापरून घराला द्या नवीन लूक... पाहा नक्की काय करता येऊ शकत...

आजकाल मॅगझीन किंवा मासिक वाचणाऱ्यांची संख्या फारच कमी झाली आहे. परंतु आपल्या घरात जर एखादे जुने मॅगझीन असेल तर ते फेकून न देता घरातील भिंती सजविण्यासाठी त्याचा उपयोग करू शकतो. मासिकातील कोणताही सुंदर फोटो तुम्ही फ्रेम करून घराच्या भिंतींवर लटकवू शकता.

आता बजेटमध्ये घर सजवणे झाले सोपे... घरातीलच वस्तू वापरून घराला द्या नवीन लूक... पाहा नक्की काय करता येऊ शकत...

जुन्या चादरींमधून चौरस किंवा वेगवेगळ्या आकाराचे तुकडे कापून घ्या. मग त्यापासून तुमची नवीन पॅचवर्क बेडशीट तयार करू शकता. त्याचप्रमाणे पॅचेस जोडून तुम्ही पडदे, सोफा कव्हर आणि पिलो कव्हर्स बनवू शकता. अशाप्रकारे जुन्या चादरीही तुम्ही वापरु शकता.

आता बजेटमध्ये घर सजवणे झाले सोपे... घरातीलच वस्तू वापरून घराला द्या नवीन लूक... पाहा नक्की काय करता येऊ शकत...

टाकाऊ वस्तूंचा विचार केला तर प्लॅस्टिकच्या बाटल्या या आपल्या घरात सहज उपलब्ध असतात. घरी उरलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून, तुम्ही केवळ पर्यावरणाचे रक्षण करत नाही तर घर सजावटीसाठीदेखील तुम्ही त्याचा वापर करू शकता. प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून पेन होल्डर बनवू शकता. प्लास्टिकची बाटली अर्धी कापून बाटलीच्या खालच्या भागाला तुमच्या आवडीनुसार सजवून घरातील छोट्या वस्तू किंवा कंगवा ठेवण्यासाठी वापरले जाऊ शकते.

आता बजेटमध्ये घर सजवणे झाले सोपे... घरातीलच वस्तू वापरून घराला द्या नवीन लूक... पाहा नक्की काय करता येऊ शकत...

रसगुल्ला, गुलाबजाम किंवा मशरूमचे टिन बॉक्सेस या टाकाऊ वस्तूंपासून एक सर्वोत्तम उपयोगी वस्तू बनवू शकता. हे टिन बॉक्सेस रंगवा आणि चमचे, काटे किंवा चाकू यांसारख्या स्वयंपाकघरातील वस्तू ठेवण्यासाठी त्यांचा वापर करा.

आता बजेटमध्ये घर सजवणे झाले सोपे... घरातीलच वस्तू वापरून घराला द्या नवीन लूक... पाहा नक्की काय करता येऊ शकत...

तुमच्या घरात जर जुन्या लग्नपत्रिका, जुने कार्डबोर्ड कटआउट्स, चार्ट पेपर्स, जुनी मासिके, लिफाफे असतील. तर लहान मुलांना आकर्षक बुकमार्क्स बनवण्यासाठी यांचा वापर करू द्या. बुकमार्क कोणत्याही आकारात कापले जाऊ शकतात आणि नंतर त्यांना चमकदार रंगांनी पेंट करा. पेंट केल्यानंतर तुम्ही यावर प्रेरणादायी कोट्स लिहू शकता. पेंट कोरडे झाल्यावर वरच्या बाजूला एक पातळ रिबन जोडून तुम्ही बुकमार्क म्हणून वापरू शकता.