टक्कल करून बोहल्यावर चढली ही नवरी, दिसली कमाल सुंदर! म्हणाली, आजार छळतो मला पण..
Updated:February 4, 2025 11:14 IST2025-02-04T10:51:09+5:302025-02-04T11:14:28+5:30
Nihar Sachdeva : नीहारचं नुकतंच लग्न झालं असून ती लग्नात फार सुंदर दिसत होती. सुंदर दिसण्यासाठी तिला डोक्यावर लांब केसांची गरजच भासली नाही.

Viral News: सध्या सोशल मीडियावर डोक्यावर केस नसलेल्या नवरीची चांगली चर्चा रंगली आहे. या नवरीचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. डोक्यावरचे केस हे सुंदरतेचं प्रतिक मानले जातात. जर डोक्यावर केस नसतील तर लोकांची खिल्ली उडवली जाते. खासकरून डोक्यावर केस नसलेल्या मुलीशी कोण लग्न करणार? असा प्रश्न लोक विचारत असतात. मात्र, काही मुलींमध्ये इतका आत्मविश्वास असतो की, त्यांना या प्रश्नाचं उत्तर देणं खूप चांगल्या पद्धतीनं येतं. याच मुलींपैकी एक आहे डिजिटल कंन्टेन्ट क्रिएटर नीहार सचदेवा. नीहारनं लोकांची विचार करण्याची पद्धतच बदलून टाकली आहे.
नीहारचं नुकतंच लग्न झालं असून ती लग्नात फार सुंदर दिसत होती. सुंदर दिसण्यासाठी तिला डोक्यावर लांब केसांची गरजच भासली नाही. फोटोमध्ये तिचा आत्मविश्वास भरभरून दिसतो आहे. पण लोकांना प्रश्नही पडला आहे की, तिच्या डोक्यावर केस का नाहीत? तर नीहार ही एलोपेसिया एरीटा नावाच्या आजारानं पीडित आहे. तिने स्वत:वर प्रेम व्यक्त करत लग्नात वीग वापरला नाही.
कशामुळे गेले तिचे केस?
एलोपेसिया एरीटा एक त्वचा रोग आहे. ज्यात डोकं, चेहरा आणि शरीराच्या काही भागातील केस गळतात. हा एक ऑटोइम्यून आजार आहे. ज्यात शरीराची इम्यून सिस्टीम चुकून केसांच्या रोमाछिद्रावर हल्ला करते. बालपणीच या आजारामुळे नीहारचे केस गेले होते. ज्यानंतर कुटुंबियांनी तिला वीग लावण्याचा प्रयत्न केला. पण नीहारनं तिच्यासोबत झालेली समस्या स्वीकारत उरले-सुरले केसही काढून टाकले. इतकंच नाही तर जे लोक तिची खिल्ली उडवत होते, त्यांना पार्टीला बोलवलं आणि आपला सुंदर बाल्ड लूक कॅरी केला.
नीहारला नवरीच्या ड्रेसमध्ये अशाप्रकारे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. एकीकडे ती कमालीची सुंदर दिसत होती आणि दुसरीकडे टक्कल पडलेल्या मुलीशी लग्न कोण करणार? असा प्रश्न विचारणाऱ्या लोकांची तोंड बंद झाली होती. याआधीही नीहार TheBaldBrownBride अभियाना अंतर्गत नवरी बनली आहे. ज्यातून तिने हे स्पष्ट केलं की, सौंदर्य केसांमध्ये नाही तर आत्मविश्वासात आहे.
भारतात जन्माला आलेली आणि अमेरिकेत राहणारी नीहार सचदेवानं १९ जानेवारी २०२५ मध्ये अरूण वी गणपतीसोबत लग्न केलं. कपलनं त्यांचे लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. लोकांना दोघांचंही कौतुक केलं.
नीहारनं तिच्या लग्नाआधी TheBaldBrownBride अभियाना अंतर्गत नवरी बनण्याचा अनोखा अनुभव शेअर केला होता. बाल्ड लूकला नॉर्मल आणि सुंदर बनवण्यासाठी तिने तिच्या अंदाजाने एक चांगलं उदाहरण सादर केलं आहे. त्यावेळीही तिनं लाल रंगाचा लेहंगा घातला होता.