घरातील झुरळं- पाली जातील पळून, केमिकल स्प्रे सोडा, ५ नैसर्गिक उपाय - किचन राहील एकदम चकाचक

Updated:March 29, 2026 14:18 IST2026-03-29T13:49:34+5:302026-03-29T14:18:19+5:30

5 magic tips for a pest-free kitchen: Get rid of lizards naturally in 5 minutes: Keep your kitchen clean and shiny: ५ 'मॅजिकल' घरगुती उपाय केले तर झुरळाचा नायनाट होईल.

घरातील झुरळं- पाली जातील पळून, केमिकल स्प्रे सोडा, ५ नैसर्गिक उपाय - किचन राहील एकदम चकाचक

स्वयंपाकघर हे घराचे मुख्य ठिकाण असते. पण या ठिकाणी झुरळं वावरत असतील तर आरोग्यासाठी मोठा धोका असतो. झुरळमुळे टायफॉइड, कॉलरा आणि अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो. अनेकदा आपण बाजारात मिळणारे महागडे केमिकल स्प्रे किंवा औषधं वापरतो, पण स्वयंपाकघरात अशा विषारी रसायनांचा वापर करणं अन्नाच्या सुरक्षेच्या दृष्टीने घातक ठरु शकते. (5 magic tips for a pest-free kitchen)

घरातील झुरळं- पाली जातील पळून, केमिकल स्प्रे सोडा, ५ नैसर्गिक उपाय - किचन राहील एकदम चकाचक

स्वयंपाकघरातील मसाल्यांच्या डब्यातील काही साध्या गोष्टी वापरून आपण झुरळांचा कायमचा बंदोबस्त करू शकतो. ५ 'मॅजिकल' घरगुती उपाय केले तर झुरळाचा नायनाट होईल. (Get rid of lizards naturally in 5 minutes)

घरातील झुरळं- पाली जातील पळून, केमिकल स्प्रे सोडा, ५ नैसर्गिक उपाय - किचन राहील एकदम चकाचक

बोरीक ॲसिड आणि साखर हा झुरळांना पळवण्याचा सर्वात जुना आणि नेहमीचा उपाय आहे. बोरिक अॅसिड आणि पिठीसाखर समप्रमाणात मिसळा. साखर झुरळांना आकर्षित करते, तर बोरीक अॅसिडमुळे झुरळांचा नायनाट होतो.

घरातील झुरळं- पाली जातील पळून, केमिकल स्प्रे सोडा, ५ नैसर्गिक उपाय - किचन राहील एकदम चकाचक

तमालपत्राचा सुगंध झुरळांना अजिबात सहन होत नाही. तमालपत्राची पाने हाताने कुस्करुन किंवा त्यांची पूड करुन किचनच्या कपाटात, खिडकीत आणि सिंकच्या खाली ठेवा. यामुळे झुरळ गायब होतात.

घरातील झुरळं- पाली जातील पळून, केमिकल स्प्रे सोडा, ५ नैसर्गिक उपाय - किचन राहील एकदम चकाचक

पुदिनाचे तेल हे नैसर्गिक कीटकनाशक म्हणून काम करते. एका स्प्रे बाटलीत पाणी घेऊन त्यात १० ते १५ थेंब पुदिना तेल मिसळा. हे मिश्रण झुरळं लपतात त्या फटींमध्ये आणि कोपऱ्यात स्प्रे करा. यामुळे केवळ झुरळं पळणार नाहीत, तर आपले किचन सुगंधी राहील.

घरातील झुरळं- पाली जातील पळून, केमिकल स्प्रे सोडा, ५ नैसर्गिक उपाय - किचन राहील एकदम चकाचक

लवंगाचा तीव्र वास झुरळांना आवडत नाही. १०-१२ लवंगा बारीक करून त्या पाण्यात उकळून घ्या आणि त्यात लिंबाचा रस मिसळा. हे पाणी ओट्यावर किंवा जमिनीवर पुसण्यासाठी वापरा.

घरातील झुरळं- पाली जातील पळून, केमिकल स्प्रे सोडा, ५ नैसर्गिक उपाय - किचन राहील एकदम चकाचक

काकडीचा गंध झुरळांना आवडत नाही. ॲल्युमिनियमच्या भांड्यात काकडीचे काप ठेवल्यास त्यातून येणारा गंध झुरळांना दूर ठेवण्यास मदत करतो.