पावसाळ्यात साखर-मीठाला पाणी सुटतं? धान्य खराब होतं, पाहा ४ सोपे उपाय-यंदा दरवर्षीचा त्रास विसरा
Updated:May 20, 2025 17:31 IST2025-05-20T17:27:55+5:302025-05-20T17:31:15+5:30
kitchen hacks for monsoon: moisture free food tips: how to store food in rainy season: पावसाळ्यात साखर- मीठ सारख्या पदार्थांना ओलावा सुटतो, अशावेळी नेमके काय करावे सुचत नाही.

पावसाळा सुरु होण्यापूर्वीच वातावरण काही प्रमाणात दमट होते. वातावरणातील आर्द्रतेमुळे स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही पदार्थांना ओलावा सुटू लागतो.
पावसाळ्यात साखर- मीठ सारख्या पदार्थांना ओलावा सुटतो. डबा किती पॅकबंद केला तरी मुंग्या लागतात. अशावेळी नेमके काय करावे सुचत नाही.
पावसामुळे घरात ओलावा निर्माण होतो. त्यामुळे जमिनीतून किंवा भिंती ओल्या होतात. अशावेळी पदार्थ सादळतात. आपल्यासोबतही असेच काहीसे होत असेल तर ४ सोपे उपाय लगेच करा.
पावसाळ्यात साखरेला ओलाव्यापासून वाचवण्यासाठी ६ ते ७ लवंग साखरेच्या डब्यात कापडात बांधून ठेवा. असे केल्याने साखर खराब होणार नाही.
पावसाळा सुरु होण्यापूर्वी काचेच्या भांड्यात साखर साठवायला सुरुवात करा. तसेच साखर वापरताना हात आणि चमचा नेहमी कोरडा असायला हवा.
कोणत्याही भांड्यात साखर किंवा मीठ भरण्यापूर्वी त्यात कापडात बांधलेले तांदळाचे दाणे घाला. असे केल्याने पदार्थांमध्ये तयार होणार अतिरिक्त ओलावा शोषून घेण्यास मदत होईल.
ज्या भांड्यात साखर - मीठ ठेवणार असाल तर त्यामध्ये दालचिनीचे काही तुकडे घाला. असे केल्याने साखर आणि मीठ सादळणार नाही. तसेच पदार्थांची चव देखील टिकून राहिल.