Join us
Daily Top 2 Weekly Top 5

रोजचे कपडे धुताना डिटर्जंटमध्ये 'हा' पदार्थ मिसळा, जुने कपडेही चमकतील नव्यासारखे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2026 15:13 IST

1 / 7
कपडे धुणं हे रोजचं काम. कोणी कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिन वापरतं तर कोणी हातानेच कपडे धुवून टाकतात.(simple tricks and tips for washing clothes)
2 / 7
आता या दोन्हींपैकी कोणतीही पद्धत वापरली तरी काही दिवसांनी कपडे जुनाट दिसायला लागतात, पांढरट कपड्यांवर पिवळी झाक यायला लागते..(how to wash clothes)
3 / 7
असं होऊ नये म्हणून कपडे धुताना नेमकं काय करावं याची एक खास ट्रिक आता आपण पाहणार आहोत..(cleaning tips for white clothes)
4 / 7
कपडे हाताने धुवायचे असतील तर ते धुण्यापुर्वी काही मिनिटं आपण डिटर्जंटच्या पाण्यात भिजत घालतो. किंवा मशिनमध्ये लावायचे असतील तरीही त्यात डिटर्जंट पावडर किंवा लिक्विड घालावे लागते.
5 / 7
यावेळी नुसत्या डिटर्जंटऐवजी थोडा बेकिंग सोड्याचा वापर करा. यामुळे कपडे नेहमीपेक्षा खूप स्वच्छ आणि चकाचक दिसतील.
6 / 7
एवढंच नाही तर पांढऱ्या कपड्यांवरील पिवळटपणाही कमी होण्यास मदत होईल. यासाठी साधारण तुम्ही १ वाटी वॉशिंग पावडर घेणार असाल तर त्यामध्ये १ टेबलस्पून एवढा बेकिंग सोडा घालावा. अशा पद्धतीचं मिश्रण तयार करूनच तुम्ही एखाद्या बरणीमध्ये ठेवू शकता.
7 / 7
रोजचे कपडे जर या पद्धतीने धुतले तर बघा काही दिवसांतच तुमचे जुने कपडेही कसे नव्यासारखे चमकू लागतील.
टॅग्स : स्वच्छता टिप्सहोम रेमेडी