Margashirsha 2025: मार्गशीर्ष गुरूवार विशेष कळस वस्त्र; ५० रूपयांत ८ डिजाईन्स, पाहा महालक्ष्मीसाठी खास वस्त्र
Updated:November 7, 2025 15:13 IST2025-11-07T13:42:12+5:302025-11-07T15:13:34+5:30
Margashirsha Guruvar 2025 : महालक्ष्मीला प्रिय लाल गुलाबी, सोनेरी, पिवळा, हिरवा यांसारख्या तेजस्वी रंगाच्या वस्त्रांना मागणी जास्त असते.

मार्गशीर्ष (Margashirsha 2025) महिन्यातील गुरूवारचे व्रत आमि महालक्ष्मीची स्थापना करण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे कलश वस्त्र उपलब्ध आहेत. (Margshish Kalash Saree)
रेडीमेड साडी खूपच लोकप्रिय असून यात देवीच्या आकाराचे शिवलेले छोटे घागरा-चोली किंवा साडीचे रूप तयार करून मिळते. (Margshish Guruvar Special Kalash Vastra Designs)
देवीसाठी खास पैठणी नमुना किंवा सिल्क फॅब्रिक वापरून बनवलेले वस्त्र उपलब्ध असतात जे अधिक आकर्षक दिसतात.
साधे पण सोनेरी किंवा चंदेरी रंगाच्या जरीची किनार असलेले वस्त्रसुद्धा तुम्ही घेऊ शकता.
महालक्ष्मीला प्रिय लाल गुलाबी, सोनेरी, पिवळा, हिरवा यांसारख्या तेजस्वी रंगाच्या वस्त्रांना मागणी जास्त असते.
काही ठिकाणी आकर्षक सजावटीसाठी खास फॅब्रिक वापरून बनवलेले वस्त्र मिळते.
साधारण ५० रूपयांपासून ते २०० रूपयांपर्यंत या वस्त्रांची किंमत असते. काही वस्त्र ४५० रूपयांपेक्षा अधिक किमतीची सुद्धा असतात.
ही किंमत बाजारातील ठिकाणं, वस्त्रांचा आकार आणि वापरलेल्या साहित्याच्या गुणवत्तेनुसार बदलते.