1 / 9मराठी लग्नात साखरपुडा हा विधी फक्त एकमेकांना अंगठ्या घालण्याएवढाच मर्यादित नसतो. या विधीमध्ये नवरदेवाकडचे लोक नवरीला साखरेचा पुडा. खरंतर यामुळेच हा विधी साखरपुडा म्हणून ओळखला जातो.2 / 9हल्ली खूप वेगवेगळ्या पद्धतींनी साखरपुडा पॅक करण्यात येतो...3 / 9तो इतक्या छान पद्धतीने सजवून जर होणाऱ्या नवरीला दिला तर ती तर खुष होईलच, पण तिच्यासोबत मुलीकडची सगळी मंडळीच खुष होतील..4 / 9हा साखरपुडा तयार करण्यासाठी खूप काही वेगळं साहित्य लागत नाही. अगदी घरात असणाऱ्या वस्तू वापरूनही तुम्ही तो तयार करू शकता..5 / 9मराठी लग्नात असा एखादा खण कापडाचा साखरपुडा दिला तर तो जास्तच आकर्षक दिसेल..6 / 9खणाच्या साखरपुड्याचा हा बघा एक आणखी सोपा आणि घरच्याघरी सहज जमू शकणारा प्रकार.. 7 / 9अशा पद्धतीने फेटा, नथ, चंद्रकोर आणि गजरा लावून तुम्ही साखरपुडे तयार करू शकता आणि दोन्ही एकत्र करूनच नववधूला देऊ शकता. 8 / 9या पद्धतीने साखरपुडा तयार करून त्यावर नवरदेव आणि नवरीचा फोटो लावूनही तुम्ही तो होणाऱ्या नवरीला देऊ शकता. 9 / 9विकतचे साखरपुडे खूप महाग मिळतात. त्यापेक्षा थोडा वेळ काढून असा साखरपुडा घरीच तयार केला तर त्याचा आनंद निश्चितच जास्त असतो..