1 / 8विविध राज्यांमध्ये विविध प्रकारचा पोशाख वापरला जातो. मात्र भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये साडी तर नेसलीच जाते. साडी नेसायची पद्धत जरी वेगवेगळी असली तरी साडी नेसली जाते.2 / 8महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्यांना आपण अस्सल महाराष्ट्रीय म्हणून संबोधतो. त्यामध्ये विविध खाद्यपदार्थ येतात. अगदी सवयीसुद्धा येतात. तसेच पोशाखाचा विषय आल्यावर डोक्यात प्रथम नऊवारीचाच विचार येतो.3 / 8महाराष्ट्रामध्ये विविध सणांना तसेच खास कार्यक्रमांना नऊवारी नेसली जाते. आजही अनेक महिला लग्नाला उभ्या राहताना नऊवारीच नेसणं पसंत करतात.4 / 8नऊवारी नेसण्याच्या विविध पद्धती आजकाल ट्रेंडमध्ये आहेत. पारंपारिक पद्धती तर आहेतच, मात्र इतरही काही नवी पद्धती आता महिला वापरतात, खास करून तरुण वर्गातील मुली.5 / 8ब्राम्हणी नऊवारी हा एक प्रकार आजही अनेक जणींना नेसायला आवडतो. या पद्धतीने नेसलेली साडी अगदीच सुंदर दिसते. पूर्वी ब्राम्हण घरातील महिला अशा साड्या नेसायच्या.6 / 8ब्राम्हणी व पेशवाई पद्धत अनेकांना सारखीच वाटते. मात्र या दोन्ही वेगवेगळ्या पद्धती आहेत. अर्थात त्यामध्ये फार काही फरक नसतो. मात्र संपूर्ण साडी सारख्या पद्धतीने नेसली जात नाही.7 / 8कोळी समाजातील महिला आजही रोज नऊवारी नेसतात. मात्र त्यांची नेसायची पद्धत अगदीच वेगळी असते. काम करताना सुटसुटीत वाटेल, काही अडचण येणार नाही या पद्धतीने ही साडी नेसली जाते.8 / 8उन्हाळ्यामध्ये कॉटनची नऊवारी नेसणे अगदी सुखकर ठरेल. नऊवारीमध्ये घाम खूप येतो. त्याचे ओघळ अगदी पायापर्यंत वाहतात. त्यामुळे जर साडी कॉटनची असेल तर मग अगदीच उत्तम.