Join us   

Ketaki Chitale Latest News : सतत वादग्रस्त विधानं करणारी केतकी चितळे आहे कोण? आजवर काय काय बोलली..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 1:33 PM

1 / 12
मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपमानास्पद, आक्षेपार्ह अशी फेसबुक पोस्ट केल्यानं ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. तिच्यावर तिच्यावर IPC कलम 500 (मानहानी), 501 (बदनामीकारक बाब) आणि 153A (धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा इत्यादी कारणांवरून विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि यासाठी प्रतिकूल कृत्ये करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Who is Ketaki Chitale The Marathi actor arrested for posting derogatory remarks against Sharad Pawar)
2 / 12
केतकी चर्चेचा विषय ठरण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही आपल्या वादग्रस्त विधांनामुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे ती वादात सापडली होती. केतकी चितळे कोण आहे. ती प्रसिद्ध कशी झाली, यापूर्वी काय काय बोलली होती, तिला का ट्रोल करण्यात आलं हे सविस्तर जाणून घेऊया. (Ketaki Chitale booked and arrested for sharing a derogatory Facebook post)
3 / 12
सुरूवातीला केतकी आंबट गोड या छोट्या पडद्यावरील मालिकेत दिसली त्यानंतर तुझं माझं ब्रेकअप या झी मराठीवरील मालिकेतील तिनं भूमिका साकारली. त्यानंतर फारशी सक्रिय दिसली नाही.
4 / 12
सुरूवातीला केतकी आंबट गोड या छोट्या पडद्यावरील मालिकेत दिसली त्यानंतर तुझं माझं ब्रेकअप या झी मराठीवरील मालिकेतील तिनं भूमिका साकारली. त्यानंतर फारशी सक्रिय दिसली नाही. एपिलेप्सी (Epilepsy) या आजारामुळे ती चर्चेत आली होती. या आजारामुळे तिला मालिकेतून काढून टाकण्यात आलं असं तिचं म्हणणं होतं. ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्वत:ला एपिलेप्सी क्विन म्हणवते.
5 / 12
1 मार्च 2020 रोजी केतकीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. दलित समाजाबद्दलच्या या आक्षेपार्ह पोस्टसोबतच केतकीने एक नवा वाद ओढवून घेतला होता. ‘नवबौद्ध, 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू, असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसºयांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वत:च्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वत:चा धर्म आम्ही विसरतो,’
6 / 12
अशी पोस्ट तिनं फेसबुकवर लिहिली होती. तिच्या पोस्टची तीव्र शब्दांत निंदा झाली होती. ‘नवबौद्ध, 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क,’ या शब्दांवर अनेकांनी आक्षेप नोंदवला होता. केतकी चितळे हिची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर तिच्या विरोधात रबाळे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
7 / 12
केतकीनं ‘शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग ३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा’! अशी संतापजनक फेसबुक पोस्ट केतकी चितळेने केली होती.
8 / 12
केतकी चितळेनं शरद पवार यांच्याबाबत नुकतीच आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये केतकीनं शरद पवार यांच्या आजारावरून टीका केली होती. तिनं आपल्या फेसबुकवर शेअर केलेल्या कवितेच्या खाली तिनं अॅडव्होकेट नितीन भावे असं नावंही दिलं आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तसंच अनेकांनी तिच्या या पोस्टवर संतापही व्यक्त केला आहे.
9 / 12
एपिलेप्सी हा एक मेंदूचा विकार आहे आणि न्यूरॉलॉजिस्टच्या उपचारांनी हा आजार पूर्णपणे आटोक्यात राहू शकतो. ज्यांना औषधोपचारांनीही काही फरक पडत नाही त्यांच्यासाठी 'ब्रेन सर्जरी' हा उपाय असू शकतो. एपिलेप्सी म्हणजे वेड लागणं नसून योग्य उपचारांनी बरा होणारा आजार आहे.
10 / 12
केतकीच्या या पोस्टनंतर राजकीय क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. किशोरी पेडणेकर यांनी एक पत्रकार परिषद घेत केतकीवर प्रतिक्रिया दिली आहे. 'मला त्या मुलीबद्दल काही बोलायचं नाही. ती मनोरुग्ण आहे. सध्या ती त्याचे धडे घेत आहे. तिला मधूनच झटका येतो. त्याच झटक्यामध्ये काहीतरी झालं असेल ज्यामुळे तिने अशी प्रतिक्रिया दिली असावी. आणि, त्यामुळेच आता तिच्यावर टीका होत आहे,' असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
11 / 12
भूमाता ब्रिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी केतकीच्या पोस्टवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. केतकीच्या पोस्टमध्ये शरद पवारांचा उल्लेख कुठेही सापडत नाही, केवळ पवार असा उल्लेख आल्याचे तिने म्हटले आहे. तसेच, केतकीविरोधात घाणेरडे ट्रोलिंग करून आपण संस्कारहीन असल्याचं दाखवू नका, असा टोला देसाई यांनी ट्रोलरला लगावला आहे.
12 / 12
मला वाटतं ती मानसिक रुग्ण आहे. आपलं वय काय आणि आपण बोलतो काय याचा जरा विचार करायला हवा. तिनं ज्या पद्धतीनं पोस्ट केली आहे. त्याच पद्धतीनं तिला प्रतिक्रिया देखील मिळत आहेत. मला वाटतं तिला आता चोप देण्याची वेळ आली आहे. कारण तिच्यावर संस्कार काही व्यवस्थित झालेले दिसत नाहीत. त्यामुळे छडी लागे छमछम विद्या येई घमघम असं म्हणतात. त्यामुळे छडीनं चोप देणं गरजेचं आहे, असं राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील म्हणाल्या.
टॅग्स : केतकी चितळेसोशल व्हायरलशरद पवार