पावसाळी हवेमुळे तिखट-मसाल्यांना जाळं लागतं? ५ टिप्स, वर्षभर डोक्याला टेंशन नाही..

Updated:May 20, 2025 19:07 IST2025-05-20T16:13:12+5:302025-05-20T19:07:55+5:30

पावसाळी हवेमुळे तिखट-मसाल्यांना जाळं लागतं? ५ टिप्स, वर्षभर डोक्याला टेंशन नाही..

उन्हाळ्याचे दिवस म्हणजे वर्षभर पुरेल एवढं वाळवण करून ठेवण्याचे दिवस. त्याशिवाय या दिवसांतच गहू, ज्वारी, तांदूळ, डाळी असं वर्षभराचं धान्यही भरून ठेवलं जातं.

पावसाळी हवेमुळे तिखट-मसाल्यांना जाळं लागतं? ५ टिप्स, वर्षभर डोक्याला टेंशन नाही..

उन्हाळ्याच्या दिवसांत आणखी एक महत्त्वाचं काम केलं जातं आणि ते म्हणजे लाल तिखट, गोडा मसाला, काळा मसाला तयार करणे.. वर्षभर पुरेल एवढा मसाला आणि तिखट याच दिवसांत करून ठेवलं जातं. पण सध्या पावसाळी हवा आहे. अवकाळी पावसाने जणू काही उन्हाळा संपल्यासारखाच झाला आहे. म्हणूनच या दिवसांत तिखट, मसाल्यांना जाळं लागून ते खराब होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घ्या..(how to store spices and mirchi powder for long?)

पावसाळी हवेमुळे तिखट-मसाल्यांना जाळं लागतं? ५ टिप्स, वर्षभर डोक्याला टेंशन नाही..

तिखट, मसाले ज्या डब्यात भरून ठेवणार आहात तो डबा पुर्णपणे कोरडा आहे याची खात्री करून घ्या. शिवाय तुम्ही ज्या ठिकाणी तिखट, मसाल्यांचे डबे ठेवणार आहात ती जागाही कोरडी आणि हवेशीर हवी.(proper method for the storage of spices and red chili powder for year)

पावसाळी हवेमुळे तिखट-मसाल्यांना जाळं लागतं? ५ टिप्स, वर्षभर डोक्याला टेंशन नाही..

लाल तिखट आणि गरम मसाला भरून ठेवताना मिठाचा वापर करा. डब्याच्या तळाशी आधी मीठ पसरवून ठेवा आणि त्यावर तिखट, मसाले भरा. मसाल्यांच्या वर एक कागद पसरवून ठेवा. त्या कागदावर मीठ पसरवा आणि मग डब्याचे झाकण लावा. मीठामुळे तिखट, मसाल्यांमध्ये जाळे होत नाही.

पावसाळी हवेमुळे तिखट-मसाल्यांना जाळं लागतं? ५ टिप्स, वर्षभर डोक्याला टेंशन नाही..

कडुलिंबाच्या पानांचा वापरही तुम्ही करू शकता. डब्याच्या तळाशी कडुलिंबाची पानं ठेवून त्यावर तिखट, मसाले भरा आणि सगळ्यात वर पुन्हा कडुलिंबाची पानं ठेवा.

पावसाळी हवेमुळे तिखट-मसाल्यांना जाळं लागतं? ५ टिप्स, वर्षभर डोक्याला टेंशन नाही..

मसाले डब्यात भरून ठेवल्यानंतर सगळ्यात वर लवंग पसरवून ठेवा. यामुळे मसाल्यांमध्ये अळ्या, किडे होत नाहीत.

पावसाळी हवेमुळे तिखट-मसाल्यांना जाळं लागतं? ५ टिप्स, वर्षभर डोक्याला टेंशन नाही..

तिखटाच्या डब्यात तेजपान किंवा तमालपत्र टाकून ठेवल्यानेही तिखटात जाळे, अळ्या, किडे होत नाहीत. तिखट वर्षभर छान टिकते.