मित्र - नातेवाईक पैसे उसने मागतात आणि परत करत नाहीत? पाहा वाईटपणा न येता ‘नाही’ कसं म्हणायचं...
Updated:March 16, 2026 23:13 IST2026-03-16T22:55:01+5:302026-03-16T23:13:32+5:30
how to stop people asking for money : dealing with friends who ask for money : how to say no when someone asks for money पैसा वाईटपणा आणतो, करा ७ गोष्टी टाळा उसनवारी...

how to stop people asking for money
"मैत्री आणि नात्यात पैसा आला की नातं बिघडतं," असं आपण अनेकदा ऐकतो. पण जेव्हा आपलेच जवळचे मित्र किंवा नातेवाईक वारंवार पैसे उधारीवर मागतात, तेव्हा मनात एक विचित्र कोंडी निर्माण होते. एका बाजूला मदतीची भावना असते, तर दुसऱ्या बाजूला स्वतःची आर्थिक ओढाताण आणि दिलेले पैसे परत मिळतील की नाही याची भीती....अशावेळी समोरच्याला मदतही करायची असते, पण स्वतःचं नुकसानही टाळायचं असतं. मग नातं न बिघडवता खंबीरपणे 'नाही' कसं म्हणायचं? (dealing with friends who ask for money).
परंतु प्रत्येक वेळी पैसे देणं शक्य नसतं आणि आपल्या आर्थिक नियोजनावरही (how to say no when someone asks for money) त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नातं टिकवून ठेवत आणि कोणालाही दुखावणार नाही अशा पद्धतीने पैसे देण्यास नकार कसा द्यावा हे समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. अशा परिस्थितीत नेमकं कसं वागावं आणि कोणत्या सोप्या उपायांनी ही परिस्थिती हाताळता येते, याबद्दलच्या काही खास टिप्स पाहूयात...
१. आधी स्वतःची आर्थिक स्थिती तपासा :-
जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याकडे पैसे मागते, तेव्हा सर्वात आधी हे तपासा की तुमच्याकडे खरोखरच तेवढे पैसे देण्याची क्षमता आहे का? जर समोरच्याला पैसे दिल्याने तुमचे स्वतःचे आर्थिक बजेट बिघडणार असेल, तर सध्या माझ्याकडे पैसे देण्याइतपत रक्कम शिल्लक नाही, असे स्पष्टपणे सांगा. तज्ज्ञांच्या मते, दुसऱ्याची मदत करण्यासाठी स्वतःला आर्थिक संकटात टाकणे कधीही योग्य नसते. असं व्हायला नको की, तुम्ही दुसऱ्याला उधार द्याल आणि ऐनवेळी तुमच्या स्वतःच्या गरजांसाठीच तुमच्याकडे पैसे उरणार नाहीत.
२.अर्धीच रक्कम देऊन वेळ मारून नेणे :-
जर समोरची व्यक्ती तुमच्याकडे २,००० रुपये मागत असेल, तर त्यांना सांगा की सध्या माझ्याकडे फक्त १,००० रुपयेच उपलब्ध आहेत. मानसशास्त्रानुसार (Psychology), असं केल्यामुळे समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की, इथून पूर्ण पैशांची सोय होणार नाही. अशा वेळी, जर त्यांना खूपच तातडीची गरज नसेल, तर ते दुसऱ्या कोणाकडून तरी पैशांची व्यवस्था बघतात. असे केल्याने तुम्हीही 'सेफ झोन'मध्ये राहता आणि समोरच्याला पूर्ण नकार दिल्यासारखंही वाटत नाही.
३. स्पष्ट आणि थेट उत्तर द्या :-
अनेक लोकांना पैसे उधार देण्याची इच्छा नसते, पण ते समोरच्याला तसे स्पष्टपणे सांगू शकत नाहीत. जर तुम्हाला 'नाही' म्हणायला संकोच वाटत असेल, तर "सध्या माझे आर्थिक बजेट थोडे कोलमडले आहे, त्यामुळे मी तुला या वेळी मदत करू शकणार नाही," असे स्पष्ट सांगा. किंवा तुम्ही असेही म्हणू शकता की, "या महिन्यात माझे काही आर्थिक नियोजन (Financial Planning) आधीच ठरलेले आहे, त्यामुळे माझ्याकडे जास्तीचे पैसे उरलेले नाहीत." लक्षात ठेवा, मनात भीती ठेवून हो म्हणण्यापेक्षा नम्रपणे दिलेला नकार कधीही चांगला असतो. जर एखादी व्यक्ती खूपच जवळची असेल, तर त्यांना स्पष्टपणे सांगा की, "मला आपल्या नात्यात पैशांचे व्यवहार आणायचे नाहीत, कारण त्यामुळे भविष्यात वाद होऊ शकतात आणि मला तुला गमावायचं नाहीये."
४. पैशांबाबत एक मर्यादा ठरवा :-
जर तुम्हाला कोणालाही पैसे उधार देणे आवडत नसेल, तर मित्र आणि नातेवाईकांना त्याबद्दल आधीच स्पष्टपणे कल्पना द्या. स्वतःचे एक आर्थिक बजेट आणि 'मनी बाउंड्री' (आर्थिक मर्यादा) निश्चित करा. असे केल्यामुळे तुम्ही नातं न बिघडवता उधार देण्यास नकार देऊ शकता. जेव्हा लोकांना तुमच्या या तत्त्वाबद्दल माहिती असते, तेव्हा पुढच्या वेळी ती व्यक्ती तुमच्याकडे पैसे मागताना विचार करेल किंवा पैसे मागणे टाळेल.
५. तातडीने उत्तर देणे टाळा :-
जर तुम्हाला कोणाला पैशांसाठी थेट 'नाही' म्हणायला जड जात असेल, तर लगेच हो किंवा नाही म्हणण्याऐवजी थोडा वेळ मागून घ्या. तुम्ही असे म्हणू शकता की, "माझं या महिन्याचं बजेट थोडं वर-खाली झालं आहे, मला एकदा हिशोब तपासावा लागेल की मी तुला मदत करू शकेन की नाही." असे केल्याने तुम्हाला विचार करायला पुरेसा वेळ मिळेल आणि दबावाखाली येऊन उधार द्यावे लागणार नाही. त्यानंतर काही वेळाने किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही सांगू शकता की, "मी चेक केलं, पण सध्या तरी इतकी रक्कम देणं मला शक्य होत नाहीये."
६. अपराधीपणाची भावना (Guilt) वाटणे स्वाभाविक आहे :-
आर्थिक तज्ज्ञांच्या मते, एखाद्या जवळच्या नातेवाईकाला किंवा मित्राला उधारीसाठी नकार देणे ही वाईट गोष्ट नाही. तरीही, अनेकांना नकार दिल्यानंतर मनात अपराधीपणाची भावना (Guilt) निर्माण होते. ही भावना येणे पूर्णपणे सामान्य आहे, पण याचा जास्त विचार करू नका. लक्षात ठेवा, जर तुम्ही दबावाखाली येऊन पैसे दिले असते, तर त्यानंतर तुम्ही अधिक काळ मानसिक तणावाखाली राहिला असता आणि कदाचित तुमच्या संपूर्ण महिन्याचे आर्थिक गणितही कोलमडले असते.
७. नातं जपण्यासाठी 'या' वाक्यांचा वापर करा :-
जेव्हा तुम्ही उधारीसाठी नकार देता, तेव्हा केवळ 'नाही' न म्हणता थोडे नम्र शब्द वापरा. तुम्ही म्हणू शकता की, "मला खरंच खूप वाईट वाटतंय की मी तुला या वेळी मदत करू शकत नाही, काश! माझी परिस्थिती सध्या तशी असती." अशा प्रकारे बोलल्यामुळे समोरच्या व्यक्तीला असे वाटते की, तुमची इच्छा असूनही काही तांत्रिक अडचणींमुळे तुम्ही मदत करू शकत नाही आहात. यामुळे समोरच्याचे मनही दुखावत नाही, तुमचे नातेही जपले जाते आणि तुमचे पैसेही वाचतात.
८. पैशांऐवजी पर्यायी मदत सुचवा :-
जर तुम्हाला खरोखर नातं टिकवायचं असेल, तर त्यांना सांगा, "मी तुला रोख रक्कम देऊ शकत नाही, पण तुला जर नोकरी शोधण्यात किंवा इतर काही कामात मदत हवी असेल, तर मी नक्की करेन." यामुळे तुमचा हेतू चांगला आहे हे सिद्ध होतं.
९. माझं बजेट सध्या कोलमडलं आहे :-
थेट नकार देण्यापेक्षा तुमची असमर्थता दर्शवा. "अरे, खरं तर मला तुला मदत करायला आवडलं असतं, पण या महिन्यात माझे स्वतःचे काही मोठे खर्च निघाले आहेत (उदा. विम्याचा हप्ता, घराचं काम किंवा गुंतवणूक), त्यामुळे सध्या माझ्याकडे जास्तीचे पैसे शिल्लक नाहीत," असं तुम्ही सांगू शकता.
१०. आम्ही घरात ठरवून खर्च करतो :-
जर नातेवाईक पैसे मागत असतील, तर तुम्ही घरच्यांचा संदर्भ देऊ शकता. "आमच्या घरात असा नियम आहे की कोणताही मोठा खर्च किंवा व्यवहार आम्ही एकमेकांना विचारल्याशिवाय करत नाही. आणि सध्या आम्ही काही आर्थिक नियोजनात आहोत, त्यामुळे मी आता तरी मदत करू शकणार नाही."