1 / 7उन्हाळा सुरु झाला की, आपल्याला वेध लागतात ते आंबे खाण्याचे पण अकाली आलेल्या पावसामुळे आंबे काही पिकले नाही. (How to ripen mango at home)2 / 7आपण आपल्या आवडीनुसार आंबे खरेदी करुन घरी आणतो. आइस्क्रिम, मँगो शेक किंवा स्मूदी बनवून खातो परंतु, काही लोकांना आंबे कसे खरेदी करायचे हे माहित नसते. त्यामुळे आंबे विकत आणले तरी ते कच्चे किंवा हिरवेच असतात.(Natural mango ripening methods) 3 / 7कच्चे आंबे खाता येत नाही. अशावेळी काही सोप्या ट्रिक्सच्या मदतीने आपण केमिकलशिवाय घरीच आंबे पिकवू शकतो. या पद्धतीने आंबे पिकवल्यास त्याची गोडी आपल्याला नक्की चाखता येईल. 4 / 7कच्चा आंबा बेड खाली किंवा ज्या भागात जास्त उष्णता असेल त्या भागात पेपरात गुंडाळून ठेवा. एका पोत्याच्या खाली ठेवून पुन्हा त्यावर दुसरे पोते ठेवू शकता. यामुळे आंबे लवकर पिकण्यास मदत होते. 5 / 7आपण आंबे पॉलिथिनच्या पिशवीत घालून पिठाच्या डब्यात ठेवू शकतो. यामुळे कच्चे आंबे लवकर पिकतात. 6 / 7पिठाच्या डब्याशिवाय तांदळाच्या डब्यात आंबे साठवून ठेवू शकता. आंबे तीन ते चार दिवसांत पिकण्यास मदत होईल. तसेच वेळोवेळी ते चेक करत राहा. 7 / 7कच्चा आंबा पिकवण्यासाठी आपण त्याला सुकलेल्या गवतामध्ये ठेवू शकतो. बॉक्समध्ये सुके गवत घाला, त्यात आंबे ठेवून गवत झाका. ही पेटी अशा ठिकाणी ठेवा जिथून प्रकाश येणार नाही. अगदी काही दिवसात आंबे पिकतील.