तळणीचे तेल फेकू नका! 'या' पद्धतीने पुन्हा वापरा, तेलाची होणार नाही नासाडी-होईल भरपूर उपयोग

Updated:November 2, 2025 18:05 IST2025-11-02T18:02:12+5:302025-11-02T18:05:36+5:30

reuse cooking oil: how to reuse fried oil: benefits of reusing cooking oil: तळलेले तेल फेकून देण्याऐवजी त्याचा पुन्हा वापर कसा करता येईल पाहूया.

तळणीचे तेल फेकू नका! 'या' पद्धतीने पुन्हा वापरा, तेलाची होणार नाही नासाडी-होईल भरपूर उपयोग

आपल्या स्वयंपाकघरात आठवड्यातून एकदा तरी पदार्थ तळले जातात. पुरी, भजी, पापड हमखास तयार केले जातात. पदार्थ तळल्यानंतर अनेकदा त्या तेलाच काय करावं असा प्रश्न आपल्याला पडतो. काही जण हे तेल पुन्हा वापरतात. पण पुन्हा वापरलेले तेल आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. (reuse cooking oil)

तळणीचे तेल फेकू नका! 'या' पद्धतीने पुन्हा वापरा, तेलाची होणार नाही नासाडी-होईल भरपूर उपयोग

तळलेले तेल पुन्हा वापरल्याने हृदयविकार, ब्रेन स्ट्रोक, लिव्हर फेल, मधुमेह किंवा कर्करोग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. अशावेळी तळलेले तेल फेकून देण्याऐवजी त्याचा पुन्हा वापर कसा करता येईल पाहूया. (how to reuse fried oil)

तळणीचे तेल फेकू नका! 'या' पद्धतीने पुन्हा वापरा, तेलाची होणार नाही नासाडी-होईल भरपूर उपयोग

तळलेले तेल पुन्हा जेवणात वापरु नका. सगळ्यात आधी त्याचा रंग, वास आणि घट्टपणा तपासा. जर तेल काळसर किंवा चिकट झालं असेल तर फेकून द्या. पण हलकासा रंग बदलला असेल तर गाळून वापरता येईल.

तळणीचे तेल फेकू नका! 'या' पद्धतीने पुन्हा वापरा, तेलाची होणार नाही नासाडी-होईल भरपूर उपयोग

तळणीचे तेल पुन्हा जेवणासाठी वापरु नका. त्याऐवजी लोखंडी वस्तूंची स्वच्छता, गंज काढणे किंवा दरवाज्याच्या कडी- कोयंड्यांना ग्रीसिंग करण्यासाठी वापरु शकतो.

तळणीचे तेल फेकू नका! 'या' पद्धतीने पुन्हा वापरा, तेलाची होणार नाही नासाडी-होईल भरपूर उपयोग

या तेलाचा वापर आपण घराबाहेरील दिव्यांसाठी वापरु शकतो. ज्यामुळे त्याचा पुन्हा वापर होईल.

तळणीचे तेल फेकू नका! 'या' पद्धतीने पुन्हा वापरा, तेलाची होणार नाही नासाडी-होईल भरपूर उपयोग

उरलेलं तेल आपण कंपोस्टमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी किंवा किटकांपासून रोपाचं संरक्षण करण्यासाठी वापरु शकतो.