1 / 7घरातील सगळ्यात जास्त वापरली जाणारी जागा बाथरुम. रोज वापरण्यामुळे फरशी आणि टाइल्सवर काळसर, पिवळसर थर जमा होतो. साबणाचा फेस, हार्ड वॉटरमधील मीठ, बॉडी ऑईल, डिटर्जंट आणि धूळ यांच्या मिश्रणामुळे हा थर दिवसेंदिवस जाड होतो. ज्यामुळे पिवळे-काळे डाग पसरतात.(natural tile cleaning tricks)2 / 7हे डाग वेळेवर साफ न केल्यास हे इतके घट्ट बसतात की महागडे क्लिनर किंवा भरपूर घासाघीस केल्याशिवाय निघत नाहीत. यामुळे फरशी निस्तेज दिसते आणि घर अस्वच्छ वाटू लागते. पण या काही सोप्या ट्रिक्स वापरल्या तर डाग सहज निघून जाण्यास मदत होईल. (remove stains from bathroom tiles)3 / 7टाइल्सवर जमा झालेला पिवळा थर काढून टाकण्यासाठी बेकिंग सोडा खूप प्रभावी आहे. तो पाण्यात मिसळून टाइल्सवर लावा. 4 / 7लिंबामध्ये आम्लयुक्त गुणधर्म आढळतात. ज्यामुळे डाग लवकर निघून जाण्यास मदत होते. ते टाइल्सवर घासा, काही मिनिटांत फरक दिसेल. 5 / 7व्हिनेगर फक्त डाग स्वच्छ करत नाही तर दुर्गंधी आणि बॅक्टेरिया काढून टाकण्यास देखील मदत करतात. यासाठी व्हिनेगर टाइल्सवर टाकून घासा. 6 / 7लिंबू आणि मीठाची पेस्ट एकत्र करुन ब्रशच्या मदतीने टाइल्स घासा. ज्यामुळे डाग नाहीसे होण्यास मदत होईल. 7 / 7एका स्प्रे बाटलीत व्हिनेगर आणि पाणी मिसळा, टाइल्सवर स्प्रे करा आणि पुसा. ज्यामुळे डाग हळूहळू हलके होतील.