1 / 5पांढऱ्याशुभ्र कपड्यावर कधी चुकून चहाचा डाग पडला तर अशावेळी एकदम घाबरून जाऊ नका. हा एक अतिशय सोपा उपाय करून पाहा..2 / 5हा उपाय करण्यासाठी आपल्याला स्वयंपाक घरातले दोन पदार्थ लागणार आहेत. त्यापैकी पहिला पदार्थ आहे बेकिंग साेडा. जिथे डाग पडला आहे तो भाग आधी पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर तो पाण्यातून बाहेर काढा आणि त्यावर थोडा बेकिंग सोडा टाका.3 / 5यानंतर त्या भागावर लिंबाचा रस टाका. सोडा आणि लिंबू यांची रिॲक्शन होऊन तिथे थोडा फेस तयार होईल. हे फसफसणे पुर्णपणे थांबेपर्यंत रुमाल तसाच राहू द्या.4 / 5त्यानंतर त्यावर थोडं डिटर्जंट टाका आणि कपडे घासण्याच्या ब्रशने ती जागा घासून काढा.5 / 5आता तो कपडा पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. धुतल्यानंतर कपडा एवढा स्वच्छ होईल की डाग कुठे पडला होता हे शोधूनही सापडणार नाही. हा उपाय aapli_aaji या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.