1 / 5पारंपरिक वारसा जपणारी पैठणी म्हणजे एकप्रकारे आपल्याकडची श्रीमंतीच असते. म्हणूनच महिला तिला जपून नेसतात. पैठणी नेसल्यावर खूप काळजीपुर्वक वावरतात.(how to remove oil stains from paithani saree?)2 / 5पण कधी तरी काहीतरी गडबड होतेच आणि चुकून पैठणीवर तेलातुपाचे किंवा अन्य कशाचे डाग पडतात (home hacks to remove stains from paithani saree). आता प्युअरसिल्क पैठणी १० हजारांपेक्षा महाग.. त्यामुळे तिच्यावर पडलेला डाग पाहताच सगळ्यात आधी आपण घाबरून जातो. पण असं करू नका. पैठणीवर डाग पडलाच तर अगदी सावकाशपणे पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा..(cleaning tips for paithani saree)3 / 5पैठणी किंवा कोणत्याही सिल्क साडीवर जर तेल किंवा तूप सांडलं तर अगदी तिथल्यातिथे ते अलगद टिपून घ्या. त्यानंतर बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करून थोडी घट्ट पेस्ट तयार करा आणि ती डागावर लावा. २ मिनिटाने वाईप्स वापरून सोडा काढून टाका. डाग पुसले जातील. 4 / 5साडीवर पडलेले तेलाचे डाग काढून टाकण्यासाठी टाल्कम पावडर देखील अतिशय उपयुक्त ठरते. तेलाच्या डागावर टाल्कम पावडर टाका. त्यानंतर ४ ते ५ मिनिटांनी सुती कपडा घेऊन तिथल्यातिथेच ती टिपून घ्या. तेल, तूप पावडरद्वारे शोषलं जाईल आणि डाग निघून जातील. 5 / 5व्हिनेगरचा वापर करूनही पैठणीवर पडलेले तेलातुपाचे डाग काढता येतात. त्यासाठी व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात एकत्र करा. आता कापसाचा बोळा किंवा सुती कपडा या मिश्रणात बुडवा. त्यानंतर तो घट्ट पिळून घ्या आणि मग डाग पुसून घ्या. २ ते ३ वेळा हा उपाय करा. डाग कुठे पडला होता हे लक्षातही येणार नाही.