Join us

घरात खूप जाळं होतं? दिवाळीची स्वच्छता झाल्यानंतर घरात शिंपडा 'हा' पदार्थ- जाळे होणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2025 09:35 IST

1 / 6
दिवाळीनिमित्त घरोघरी आता स्वच्छतेची कामं सुरू झालेली आहेत. एकदा घराची स्वच्छता झाली की मग फराळ आणि इतर सजावटीची कामं करता येतात..
2 / 6
दिवाळीच्या दिवसांत इतर कोणत्या गोष्टींची स्वच्छता करो अथवा ना करो पण भिंतींना लागलेले जाळे मात्र घरोघरी काढले जातात.
3 / 6
एकदा जाळं काढलं की पुन्हा काही दिवसांतच ते दिसायला लागतं. वारंवार जाळं काढत बसण्याचा कंटाळा येत असेल तर दिवाळीत जाळं काढून झालं की हा उपाय कराच.. महिनोंमहिने घरात जाळं होणार नाही.
4 / 6
हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये केरोसीन घ्या. केरोसीनचा उग्र वास काही वेळ तुमच्यासाठी निश्चितच त्रासदायक ठरेल. पण त्यामुळे जाळे मात्र साफ होतील.
5 / 6
त्यामध्येच थोडं मीठ टाका. केरोसीन आणि मीठ सम प्रमाणात घ्या. हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित एकत्र करा आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.
6 / 6
आता १५ दिवसांतून एकदा हे मिश्रण जिथे जिथे जाळे होतात, तिथे शिंपडा. केरोसिन आणि मिठाच्या एकत्रित गुणांमुळे जाळे होणार नाहीत. ट्राय करून पाहा.
टॅग्स : स्वच्छता टिप्सहोम रेमेडी