Join us

फरशी कितीही पुसली तरीही काळे-पिवळे डाग दिसतात? ५ टिप्स- मिनिटांत चमकेल आरशासारखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2025 15:09 IST

1 / 7
आपल्या घरामध्ये रोज लादी पुसली जाते परंतु, कितीही काही केले तरी अनेकदा फरशीवर काळे-पिवळे डाग पाहायला मिळतात. अनेकदा फरशी पुसण्यासाठी आपण महागडे केमिकल्स किंवा डिटर्जंटचा वापर करतो.(Floor cleaning tips)
2 / 7
आपले घर स्वच्छ, जंतूमुक्त आणि फ्रेश असावे असे प्रत्येकाला वाटते. यासाठी महागडे आणि रासायनिक फ्लोअर क्लीनर खरेदी करण्यापेक्षा घरगुती पद्धतीने स्वच्छ केल्यास लादी चमकण्यास मदत होईल. (Remove yellow stains from floor)
3 / 7
लिंबाचा रस हे लादी पुसण्यासाठी चांगले आहे. यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे फरशीला जंतूंपासून दूर ठेवतात. याच्या सुगंधामुळे घरात चांगला वास येतो. पाण्यात लिंबाचा रस मिसळून याने फरशी स्वच्छ करा.
4 / 7
पांढरा व्हिनेगर लादी पुसण्यासाठी चांगला आहे. यामुळे घाण आणि बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते. बादलीभर पाण्यात व्हिनेगर मिसळून फरशी पुसा. यामुळे लादी स्वच्छ होण्यास मदत होईल.
5 / 7
कडुलिंबाची पाने उकळून पाण्यामध्ये कडुलिंबाच्या तेलाचे १० ते १५ थेंब घाला आणि या पाण्याने लादी पुसा. यामुळे घर स्वच्छ राहण्यास मदत होईल.
6 / 7
लादीवर ग्रीसचे किंवा तेलाचे डाग जमा झाले असतील तर २ चमचे डिश वॉश लिक्विड किंवा कोणताही सौम्य हर्बल क्लीनर बादलीभर पाण्यात मिसळून स्वच्छ करा. ज्यामुळे डाग सहज निघून जातील आणि फरशी चमकेल.
7 / 7
लैव्हेंडरसारख्या तेलांमध्ये नैसर्गिक अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. यासाठी पाण्यात तेलाचे ५ ते १० थेंब घालून लादी पुसा यामुळे घरात सुगंध राहिल.
टॅग्स : सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स