वापरलेल्या पणत्यांवरचे तेलकट, काळपट डाग कसे काढायचे? १ सोपी ट्रिक, पणत्या नव्यासारख्या स्वच्छ होतील
Updated:October 29, 2025 09:35 IST2025-10-29T09:30:33+5:302025-10-29T09:35:02+5:30

दिवाळीत आपण घरात, अंगणात, बाल्कनीमध्ये अशा सगळ्याच ठिकाणी पणत्या लावतो.
पणत्या वापरून झाल्यानंतर त्यांच्यावर तेलकट, काळपट डाग पडतात. ते डाग काढून टाकले तर त्याच पणत्या पुन्हा पुढच्यावर्षीही वापरता येतात.
त्यासाठीच पणत्यांवर पडलेले तेलकट डाग काढून त्या नव्यासारख्या स्वच्छ कशा करायच्या ते पाहूया..
हा उपाय करण्यासाठी एका भांड्यामध्ये कडक पाणी घ्या आणि त्यामध्ये डिटर्जंट पावडर घाला.
त्या पाण्यात आता १५ ते २० मिनिटे पणत्या भिजत ठेवा. त्यानंतर एखादा खराब टुथब्रश घेऊन त्या घासून काढा. पणत्या छान स्वच्छ होतील.
त्यांना तुम्ही रंग दिला तर त्यांना आणखीनच नवं रूप मिळेल. ट्राय करून पाहा.