फ्रीजची दुर्गंधी घालवण्यासाठी रुपयाही खर्च करू नका, ५ सोपे उपाय, झटपट स्वच्छ होईल फ्रीज- कुबट वासही येणार नाही

Updated:April 2, 2026 10:06 IST2026-04-01T17:00:00+5:302026-04-02T10:06:15+5:30

Natural fridge freshener ideas at home: How to remove bad smell from refrigerator naturally: फ्रीज स्वच्छ आणि दुर्गंधी मुक्त ठेवण्यासाठी काय करायला हवे पाहूया.

फ्रीजची दुर्गंधी घालवण्यासाठी रुपयाही खर्च करू नका, ५ सोपे उपाय, झटपट स्वच्छ होईल फ्रीज- कुबट वासही येणार नाही

उन्हाळा सुरु झाला की पदार्थ खराब होऊ लागतात. अशावेळी आपण सर्व पदार्थ फ्रीजमध्ये ठेवतो. अनेकदा फ्रीज उघडताच त्यातून येणारा कुबट किंवा उग्र वास संपूर्ण किचनचा मूड खराब करतो. खराब झालेली भाजी, उघडे राहिलेले दूध किंवा लसणाची पेस्ट यामुळे दुर्गंधी येते पण इतर ताज्या अन्नाची चव देखील बिघडते. (Natural fridge freshener ideas at home)

फ्रीजची दुर्गंधी घालवण्यासाठी रुपयाही खर्च करू नका, ५ सोपे उपाय, झटपट स्वच्छ होईल फ्रीज- कुबट वासही येणार नाही

फ्रीजची दुर्गंधी घालवण्यासाठी महागडे फ्रेशनर्स किंवा केमिकल्स वापरण्यापेक्षा आपल्या किचनमधील साध्या आणि नैसर्गिक गोष्टींनी हा वास कायमचा घालवता येतो. फ्रीज स्वच्छ आणि दुर्गंधी मुक्त ठेवण्यासाठी काय करायला हवे पाहूया.(How to remove bad smell from refrigerator naturally)

फ्रीजची दुर्गंधी घालवण्यासाठी रुपयाही खर्च करू नका, ५ सोपे उपाय, झटपट स्वच्छ होईल फ्रीज- कुबट वासही येणार नाही

लिंबू हे नैसर्गिक डिओडोरायझर म्हणून काम करते. फ्रीजमधील बॅक्टेरिया आणि दुर्गंधी कमी करण्यासाठी स्वस्त उपाय आहे. यासाठी लिंबाचे एक-दोन तुकडे घ्या. त्यावर मीठ टाकून फ्रीजच्या एका कोपऱ्यात ठेवा. लिंबू फ्रीजमधली दुर्गंधी शोषून घेते ज्यामुळे फ्रीजचा वासही येत नाही.

फ्रीजची दुर्गंधी घालवण्यासाठी रुपयाही खर्च करू नका, ५ सोपे उपाय, झटपट स्वच्छ होईल फ्रीज- कुबट वासही येणार नाही

बेकिंग सोड्यामध्ये आम्लयुक्त दुर्गंधी शोषून घेण्याची अफाट शक्ती असते. यासाठी एका छोट्या वाटीत २ ते ३ चमचे बेकिंग सोडा घ्या. ती वाटी फ्रीजमध्ये ठेवा. २४ तासांत फ्रीजची दुर्गंधी कमी होईल.

फ्रीजची दुर्गंधी घालवण्यासाठी रुपयाही खर्च करू नका, ५ सोपे उपाय, झटपट स्वच्छ होईल फ्रीज- कुबट वासही येणार नाही

कॉफीचा सुगंध अतिशय तीव्र असतो. तो फ्रीजमधील कुबट वास काढून टाकण्यास मदत करतो. यासाठी एका प्लेटमध्ये थोडी कॉफी पावडर पसरवून फ्रीजमध्ये ठेवा. रात्रभरात फ्रिजमधील दुर्गंधी जाऊन कॉफीचा छान सुगंध दरवळू लागेल.

फ्रीजची दुर्गंधी घालवण्यासाठी रुपयाही खर्च करू नका, ५ सोपे उपाय, झटपट स्वच्छ होईल फ्रीज- कुबट वासही येणार नाही

संत्री खाल्ल्यानंतर आपण साली फेकून देतो, पण या साली फ्रिजसाठी उत्तम रूम फ्रेशनरचे काम करतात. यासाठी संत्र्याची ताजी साल फ्रिजच्या ट्रेमध्ये ठेवा. संत्र्यातील सायट्रिक गुणधर्मांमुळे फ्रिजमधील दुर्गंधी नैसर्गिकरीत्या नष्ट होते आणि एक फ्रेश सुगंध येतो.

फ्रीजची दुर्गंधी घालवण्यासाठी रुपयाही खर्च करू नका, ५ सोपे उपाय, झटपट स्वच्छ होईल फ्रीज- कुबट वासही येणार नाही

वर्तमानपत्राच्या कागदाचे गोळे करा, त्यावर थोडे पाणी शिंपडा आणि ते फ्रिजच्या कोपऱ्यात किंवा भाज्यांच्या ट्रेमध्ये ठेवा. कागदातील कार्बन आणि फायबर फ्रिजमधील ओलावा आणि दुर्गंधी शोषून घेतात.