Join us

फ्रीजमधून कुबट - घाण वास येतो? सोप्या टिप्स- १० मिनिटांत होईल साफ, चमकेल नव्यासारखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2025 13:10 IST

1 / 7
आपल्या स्वयंपाकघरातील सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे फ्रीज. ज्यामुळे आपल्या घरातील अन्नपदार्थ हे जास्त वेळ टिकून राहतात. परंतु अनेकदा पदार्थ कोंबल्यामुळे त्याचा वास येतो. दूध, सॉस किंवा ज्यूसारखे पदार्थ फ्रीजमध्ये सांडतात आणि फ्रीज घाण होतो. (get rid of fridge odor naturally)
2 / 7
फ्रीज वेळोवेळी साफ केला नाही तर त्यातून कुबट-घाण वास येऊ लागतो. फ्रीज साफ करणे म्हणजे वेळखाऊपणा पण १० मिनिटांत फ्रीज साफ करायचा असेल तर या सोप्या टिप्स वापरा. (fridge smells bad what to do)
3 / 7
फ्रीजची साफसफाई करण्यापूर्वी बटण बंद करा. त्यानंतर त्यातील सगळ सामान बाहेर काढा. दूध किंवा इतर पदार्थ खराब होण्याची शक्यता असेल तर फ्रीजरमध्ये ठेवा.
4 / 7
फ्रीज साफ करताना केमिकल्स ऐवजी बेकिंग सोडा आणि पांढऱ्या व्हिनेगरचा वापर करा. यामुळे कुबट आणि घाण वास येणार नाही.
5 / 7
फ्रीज ट्रे, बॉटल होल्डर आणि रॅकला कोमट पाण्याने किंवा डिशवॉशने धुवा. स्वच्छ पुसून मग फ्रीजमध्ये ठेवा. ज्यामुळे ओलावा राहणार नाही.
6 / 7
फ्रीज बंद करताना दरवाज्याजवळ असणारी रबर कायम काळी पडते. याला जुन्या ब्रशने साफ करा. साबणाच्या पाण्यात ब्रश बुडवून घासा. त्यानंतर स्वच्छ कापडाने पुसा.
7 / 7
फ्रीजमधून सारखा वास येत असेल तर एका बाऊलमध्ये बेकिंग सोडा आणि कॉफी ठेवा. ज्यामुळे घाण वास निघून जाईल.
टॅग्स : सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स