घरच्याघरीच तयार करा होळीचे नैसर्गिक रंग, त्वचा - केस राहतील सुरक्षित - रंगपंचमी खेळ बिंधास्त !

Updated:March 11, 2025 19:06 IST2025-03-11T18:32:58+5:302025-03-11T19:06:41+5:30

How To Make Natural Colours Making Memorable & Safe Holi : How to Prepare Natural Colours for the Festivities of Holi : How to make Organic Holi Colours at Home : How to make Natural holi Colours At Home : हानिकारक केमिकल्सयुक्त रंगांपेक्षा खेळा नैसर्गिक घरगुती रंगांची स्पेशल होळी....

घरच्याघरीच तयार करा होळीचे नैसर्गिक रंग, त्वचा - केस राहतील सुरक्षित - रंगपंचमी खेळ बिंधास्त !

होळीचा सण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहात (How to make Natural holi Colours At Home ) साजरा करण्यात येतो. होळी म्हणजे रंगाची उधळण करणारा सण. रंगपंचमी या दिवशी खास रंगीबेरंगी रंगांची उधळणं करून रंगपंचमी साजरी केली जाते. रंगपंचमी रंगांशिवाय अधुरीच आहे. यासाठी आपण सगळेचजण रंगपंचमी साठी बाजारांतून रंग विकत आणतो. परंतु या रंगांमध्ये हानिकारक केमिकल्स मिसळले जातात. जे आपल्या त्वचा आणि केसांसाठी फार हानिकारक असतात.

घरच्याघरीच तयार करा होळीचे नैसर्गिक रंग, त्वचा - केस राहतील सुरक्षित - रंगपंचमी खेळ बिंधास्त !

त्याऐवजी जर घरच्याघरीच रंग तयार (How to make Organic Holi Colours at Home) करून त्याने रंगपंचमी खेळलात तर आरोग्य जपण्यास (How To Make Natural Colours Making Memorable & Safe Holi) मदत होईल. तुम्ही घरी रंग तयार करण्याचा विचार करत असाल तर घरात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंच्या मदतीने नैसर्गिक पद्धतीने रंग तयार करू शकता. हे रंग त्वचेला नुकसान पोहचवण्याऐवजी फायदाच पोहोचवतात.

घरच्याघरीच तयार करा होळीचे नैसर्गिक रंग, त्वचा - केस राहतील सुरक्षित - रंगपंचमी खेळ बिंधास्त !

बेसन आणि हळद दोन्ही एकत्र करून घ्या. हे एकत्र केल्यानंतर तुम्हाला सुकलेला पिवळा रंग मिळण्यास मदत होईल. हे दोन्ही पदार्थ त्वचेसाठी फायदेशीर आहेत. हळदीमध्ये अन्टीसेफ्टिक गुणधर्म आढळून येतात. तर बेसन चेहरा स्वच्छ करण्यासाठी मदत करतं. तुम्हाला गरज असेल तर झेंडूची फुल पाण्यामध्ये उकळून पिवळा रंग तयार करू शकता.

घरच्याघरीच तयार करा होळीचे नैसर्गिक रंग, त्वचा - केस राहतील सुरक्षित - रंगपंचमी खेळ बिंधास्त !

गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून आपण गुलाबी रंग तयार करू शकतो. गुलाबाच्या पाकळ्या पाण्यांत घालून उकळवून घ्यावे. त्यानंतर या पाकळ्यांचा रंग पाण्यांत उतरतो. आता या पाण्यांत आरारोट पावडर घालून ती मिक्स करून घ्यावी. ही पावडर उन्हांत वाळवून घ्यावी. मग तुमचा गुलाबी रंग तयार होईल.

घरच्याघरीच तयार करा होळीचे नैसर्गिक रंग, त्वचा - केस राहतील सुरक्षित - रंगपंचमी खेळ बिंधास्त !

कोरडा लाल रंग तयार करण्यासाठी लाल जास्वंदाच्या फूलाचा वापर करू शकता. त्यासाठी जास्वंदाच्या फूलाची पावडर पिठासोबत एकत्र करून तयार करा. त्याऐवजी गाजराला पाण्यामध्ये उकळून लाल रंग तयार करू शकता.

घरच्याघरीच तयार करा होळीचे नैसर्गिक रंग, त्वचा - केस राहतील सुरक्षित - रंगपंचमी खेळ बिंधास्त !

मिक्सरच्या भांड्यात पालक आणि कोथिंबीर घ्या. त्यात थोडे पाणी मिसळून मिश्रण वाटून घ्या. एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा टॅल्कम पावडर घ्या. त्यात एक टेबलस्पून गुलाबपाणी मिक्स करा. त्यानंतर तयार पालक - कोथिंबीरची पेस्ट मिसळा. अशा प्रकारे हिरवा रंग तयार होईल.

घरच्याघरीच तयार करा होळीचे नैसर्गिक रंग, त्वचा - केस राहतील सुरक्षित - रंगपंचमी खेळ बिंधास्त !

झेंडूची फुले पिवळ्या आणि नारिंगी रंगाची असतात. याचा वापर करुन तुम्हाला रंग बनवता येऊ शकतो. जर तुम्हाला फुलांपासून ओला रंग बनवायचा असेल तर तुम्ही फुलांच्या पाकळ्या रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून मग ते उकळवून त्यात कॉर्नफ्लॉवर घालून रंग तयार करू शकता. हा रंग उन्हांत वाळवून सुकवून त्याची पावडर करून घ्यावी.

घरच्याघरीच तयार करा होळीचे नैसर्गिक रंग, त्वचा - केस राहतील सुरक्षित - रंगपंचमी खेळ बिंधास्त !

कॉफी पावडरचा वापर करून तुम्ही ब्राऊन रंग तयार करून शकता किंवा चहा पावडर पाण्यामध्ये उकळूनही तुम्ही ब्राउन रंग तयार करू शकता. त्यानंतर कॉफी पावडर किंवा चहाचे पाणी कॉर्नफ्लोअरमध्ये मिक्स करुन हा ब्राऊन रंग तयार करु शकता. हा रंग तयार करण्यासाठी मुलतानी मातीचाही वापर करू शकता.