1 / 6१. दिवाळीला आपण अनेक जणांना फराळाला बोलवतो. पण त्यांचं येणं जमतंच असं नाही. मग शेवटी आपण त्यांच्याकडे फराळच पाठवून देतो. फराळाचे वेगवेगळे पदार्थ कसे पॅक करायचे, हा अनेकदा गोंधळवून टाकणारा प्रश्न. म्हणूनच तर दिवाळीचा फराळ पॅक कसा करायचा, यासाठी बघा या काही टिप्स.2 / 6२. असे एकसारखे डबे दुकानात मिळतात. तसे डबे घ्या आणि त्यांच्यात फराळ भरा. त्यानंतर सगळे डबे एकावर एक ठेवून ते छानशी लेस लावून बांधून टाका किंवा मग अशा खोक्यात पॅक करा.3 / 6३. झिपलॉक असणाऱ्या प्लास्टिक बॅग वापरूनही तुम्ही अशा पद्धतीने फराळाच्या पदार्थांचं पॅकिंग करू शकता.4 / 6४. अशा पद्धतीचं पॅकिंग करणं जरा महागडं जातं. पण काही ठिकाणी फराळ पाठवताना आपण पैशांचा विचार करत नाही. तशा एखाद्या ठिकाणी फराळ पाठवायचा असेल, तर असं पॅकिंग नक्कीच खूप छान दिसतं.5 / 6५. अशा पद्धतीच्या डब्यांचा वापरही तुम्ही फराळाच्या पॅकिंगसाठी करू शकता. नंतर हे डबे वापरातही येतातच. 6 / 6६. हलवाईच्या दुकानात असे मिठाईचे डबे मिळतात. ते आणून त्यातही तुम्ही फराळ पॅक करून देऊ शकता.