1 / 7सोन्याचा वाढता भाव पाहता, अनेकांनी चांदीची खरेदी करण्याची सुरुवात केली. महिलांच्या साजशृंगारांपैकी एक असणारी चांदीची जोडवी, पैंजण. याच्या चकाकीमुळे आपल्या सौंदर्यात भर पडते. (silver cleaning tips)2 / 7छुन- छुन वाजणारे पैंजण आणि जोडवी पायाचे सौंदर्य वाढवते. पण लवकरच काळे पडते. चांदीच्या दागिन्यांची चमक गेल्यानंतर आपण त्यांना पॉलिश करायला देतो. पण काही घरगुती उपाय केल्यास अवघ्या काही मिनिटांत चांदीचे दागिने पुन्हा नव्यासारखे चमकतील. (how to clean silver jewelry at home)3 / 7चांदीचे दागिने, पैंजण किंवा रिंग चमकवण्यासाठी आपण अॅल्युमिनियम फॉइलचा वापर करु शकतो. यासाठी आपल्याला कोमट पाण्यात अॅल्युमिनियमचा तुकडा घालावा लागेल. त्यात २ चमचे बेकिंग सोडा आणि मीठ घाला. १० मिनिटे पाण्यात ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. 4 / 7आपण पैंजण, जोडवी कोमट पाण्याने किंवा साबाणाने देखील स्वच्छ करु शकतो. यासाठी गरम पाणी करा, त्यात दागिने बुडवा. साबण लावून चांगले घासा. पुन्हा कोमट पाण्याने धुवा. स्वच्छ होण्यास मदत होईल. 5 / 7चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा वापर करु शकतो. यासाठी कोमट पाण्यात चमचाभर बेकिंग पावडर घालून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट अंगठ्या, पैंजणवर ब्रशने घासून घ्या. काही मिनिटांत डाग सहज निघतील. 6 / 7टूथपेस्ट चांदीच्या दागिन्यांवर लावा आणि काही मिनिटांत हलक्या हाताने घासा. कोमट पाण्याने स्वच्छ करा. 7 / 7चांदीचे दागिने कधीही डिटर्जंट, परफ्यूम किंवा ब्लीचच्या संपर्कात आणू नका. यामुळे दागिन्यांची चमक कमी होते.