तेलकट-चिकट डाग पडून खराब झालेला किचनचा ओटा चमकेल मिनिटभरात, करून तर पाहा ६ सोपे उपाय...
Updated:February 1, 2025 09:00 IST2025-02-01T09:00:00+5:302025-02-01T09:00:02+5:30
How To Make Kitchen Countertop Shine : How To Clean & Polish Countertops With Natural Ingredients : How to Clean Granite Countertops & Make Them Shine : किचनचा ओटा सतत वापरुन खराब होतो तो नव्यासारखा स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय...

किचनच्या ओट्यावर आपण अनेक काम नेहमी (How to Clean Granite Countertops & Make Them Shine) करतो. सततच्या वापराने किचनचा ओटा खराब (How To Make Kitchen Countertop Shine) होतो. ओट्यावर तेल - मसाल्यांचे चिकट, तेलकट डाग सतत पडतात. यामुळे काहीवेळा ओटा कितीही स्वच्छ केला तरीही तो खराबच दिसतो. अशावेळी महागडे क्लिनर्स, लिक्विड सोप वापरण्यापेक्षा किचनमधीलच काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करूनही आपण किचनचा ओटा नव्यासारख्रा स्वच्छ आणि लक्ख करु शकतो. हे नैसर्गिक पदार्थ कोणते ते पाहूयात.
१. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर :-
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर यांचं अनोखं कॉम्बिनेशन किचनचा ओटा स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर आहे. याच्या वापराने ओट्यावरील फक्त डागच निघून जात नाहीत तर ओटा देखील नव्यासारखा चमकदार होतो. एका भांड्यात २ चमचे बेकिंग सोडा घ्या. त्यात अर्धा कप पांढरा व्हिनेगर घालून मिक्स करा. हे मिश्रण किचन प्लॅटफॉर्मवर लावा आणि काही मिनिटे राहू द्या. त्यानंतर स्क्रब किंवा ब्रशने घासून स्वच्छ करा आणि नंतर पाण्याने धुवा.
२. लिंबू आणि मीठ :-
लिंबामध्ये नैसर्गिक अॅसिड असते जे डाग काढून टाकण्यास मदत करतात, तर मीठ स्क्रबिंग एजंट म्हणून कार्य करते. एक लिंबू कापून त्याचा अर्धा भाग करून घ्यावा. या अर्ध्या भागावर चमचाभर मीठ घालावे. असा लिंबू थेट डागांवर चोळून घासून घ्यावे. त्यानंतर ओल्या कापडाने ओटा स्वच्छ पुसून घ्यावा.
३. लिक्विड सोप आणि गरम पाणी :-
लिक्विड सोप आणि गरम पाण्याचे एकत्रित द्रावण खराब झालेला ओटा स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर ठरते. यासाठी एका बादलीत कोमट पाणी घ्या आणि त्यात २ चमचे डिशवॉशिंग लिक्विड सोप घाला. स्पंज किंवा कापड या पाण्यात बुडवून स्वयंपाकघरातील ओटा पुसून घ्यावा. यामुळे ओट्यावरील तेलकट - चिकट डाग निघून जाऊन ओटा चमकदार दिसेल.
४. टूथपेस्ट :-
टूथपेस्ट फक्त दात स्वच्छ करण्यासाठीच नाही तर स्वयंपाकघरातील ओटा स्वच्छ करण्यासाठी देखील उत्तम उपाय आहे. किचनमधील ओट्यावर टूथपेस्ट सगळीकडे पसरवून लावा. त्यानंतर ब्रश किंवा स्क्रब पॅड वापरुन हलक्या हाताने घासून घ्या. काहीवेळासाठी तसेच ठेवून द्या. त्यानंतर ओटा स्वच्छ धुवून घ्यावा. यामुळे किचनचा ओटा फक्त स्वच्छच होणार नाही तर नव्यासारखा चमकू देखील लागेल.
५. खोबरेल तेल :-
जर तुमच्या किचनमधील ओटा हा ग्रॅनाइट किंवा संगमरवरी असेल तर त्याची चमक वाढवण्यासाठी आपण खोबरेल तेलाचा वापर करु शकतो. एका कॉटनच्या मऊ सुती कापडावर थोडे खोबरेल तेल घ्या. त्यानंतर संपूर्ण ओट्यावर हलक्या हाताने घासून घ्या. १० ते १५ मिनिटांनी कोरड्या कापडाने पुसून घ्यावे. या नैसर्गिक उपायामुळे तुमच्या ओट्याला पॉलिश केल्यासारखे वाटेल आणि तुमचा ओटा अधिकच चमकू लागेल.
६. हायड्रोजन पेरोक्साइड आणि बेकिंग सोडा :-
हायड्रोजन पेरोक्साइड आणि बेकिंग सोडायचे एकत्रित मिश्रण किचनचा ओटा स्वच्छ करून त्यावरील जिवाणू नष्ट करण्यास अधिक मदत करते. यासाठी एका भांड्यात प्रत्येकी २ चमचे बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पेरॉक्साइड मिक्स करा. ही तयार पेस्ट ओट्यावर लावून १० मिनिटे तशीच ओट्यावर राहू द्या. सगळ्यांत शेवटी ओलसर कापडाने ओटा पूर्णपणे पुसून टाका यामुळे ओटा स्वच्छ होऊन नव्यासारखा दिसू लागेल.