1 / 7घर कितीही स्वच्छ ठेवलं तरी स्वयंपाकघर किंवा बाथरुममध्ये आपल्याला झुरळं, पाली दिसतात. यांच्यामुळे घरात घाणही पसरते आणि आपलं आरोग्य देखील खराब होतं. अशावेळी आपण केमिकल्स आणि पेस्ट कंट्रोल करण्याचा विचार करतो. यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. (how to get rid of cockroaches at home)2 / 7घरातील झुरळं - पाली घालवण्यासाठी काही सोपे आणि नैसर्गिक उपाय करुन बघा. यामुळे घरही स्वच्छ होईल आणि कीटकांचा त्रासही कमी होईल. (diwali cleaning tips for pest control)3 / 7झुरळं-पालींना कापूर आणि लवंगाचा वास आवडत नाही. त्यामुळे घराची स्वच्छता करताना कानाकोपऱ्यात कापूरचे ५ ते ६ तुकडे बारीक करा, पाण्यात घाला. नंतर लवंगाचे तेल घालून या पाण्याने घर स्वच्छ करा. कीटक दूर राहतील. 4 / 7कांदा-लसणचा उग्र वास कीटकांना सहन होत नाही. यांचा रस काढून पाण्यात मिसळा आणि घरभर फवारणी करा. ज्यामुळे फरशीही चमकेल आणि कीटक घरात दिसणार नाही. 5 / 7झुरळं-पाली घरात कायम दिसत असतील तर व्हिनेगर-बेकिंग सोड्याचा वापर करा. हे दोन्ही घटक पाण्यात मिसळून लादी पुसा. कीटकांना याचा वास आवडत नाही. असं रोज केल्याने झुरळं कायमचे पळून जातील. 6 / 7एक बादली पाण्यात ४ ते ५ चमचे मीठ आणि दोन लिंबाचा रस पिळून घाला. पाण्याने फरशी, भिंती स्वच्छ करा. तसेच घरातील कानाकोपऱ्यात देखील स्प्रे करु शकता. 7 / 7पाली-झुरळांना पळवण्यासाठी कॉफी फायदेशीर आहे. तंबाखू आणि कॉफीचे लहान गोळे बनवून घरातील कानाकोपऱ्यात, खिडकी जवळ ठेवा. ज्यामुळे कीटक नाहीसे होतील. घरात लहान मुले-पाळीव प्राणी असतील तर विशेष काळजी घ्या.