कबुतरांना शत्रू वाटणारे किचनमधले ५ पदार्थ बाल्कनीत ठेवा, कबुतरं फिरकणार नाहीत..
Updated:April 11, 2026 13:50 IST2026-04-11T12:47:31+5:302026-04-11T13:50:17+5:30
How do I Get Rid Of Pigeons In Balcony (How TO Avoid Pigeons In Balcony) : तमालपत्राचा वासही कबुतरांना अजिबात आवडत नाही ही पानं तुम्ही घरटी असलेल्या ठिकाणी ठेवू शकता.

बाल्कनीत कबुतरांचा वावर वाढला की घाण आणि आरोग्याच्या समस्या उद्भवतात. कबुतरांना पळवून लावण्यासाठी तसंच त्यांना घरापासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही घरातील काही वस्तू वापरू शकता. (How To Avoid Pigeons In Balcony)
काळी मिरी
काळ्या मिरीची पूड कबुतरांच्या नाकात गेल्यास त्यांना अस्वस्थ वाटते त्यामुळे ते त्या जागेवर येत नाहीत.
लाल तिखट
बाल्कनीत कठड्यावर किंवा कोपऱ्यात लाल तिखट शिंपडल्यानं कबुतरांना तिथे बसणं कठीण होतं.
लवंग, कांदा किंवा लसूण
लवंगाचा उग्र वास आणि त्यातील तेल कबुतरांना दूर ठेवण्यास मदत करते.तसंच ठेचलेला लसूण किंवा कांदासुद्धा कबुतरांना दूर करण्यास मदत करतो.
मिठाचं पाणी
मिठाच्या पाण्याचा सतत फवारा मारल्यानं त्या जागी कबुतरांना त्या वासानं पळवून लावता येते.
तमालपत्र
तमालपत्राचा वासही कबुतरांना अजिबात आवडत नाही ही पानं तुम्ही घरटी असलेल्या ठिकाणी ठेवू शकता.
कबुतरांची विष्ठा आणि घरट्यांच्या काड्या त्वरीत साफ करा. या वासामुळे त्यांना ती जागा आपली वाटते.