Join us

घरात माऊस ग्लू ट्रॅप ठेवूनही उंदीर पकडल्या जात नाही? १ सोपा उपाय- उंदीर घरातून पळून जातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2025 09:20 IST

1 / 7
घरात उंदीर शिरला की त्याला घराबाहेर काढणं खूप अवघड होऊन जातं.
2 / 7
हल्लीचे उंदीर एवढे स्मार्ट झाले आहेत की त्यांना पकडण्यासाठी घरात माऊस ग्लू ट्रॅप ठेवूनही काही उपयोग होत नाही.
3 / 7
अशावेळी उंदरांना घरातून पळवून लावण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा.
4 / 7
हा उपाय करण्यासाठी एक तेजपान घ्या. तेजपानमध्ये असणारे काही घटक उंदराची पचनक्रिया बिघडवून टाकतात.
5 / 7
त्या तेजपानवर तूप टाका आणि ते जिथे उंदीर जास्त येतात, त्या ठिकाणी ठेवून द्या. तुपामुळे उंदीर तेजपानाकडे आकर्षित होतात आणि ते खाण्याचा प्रयत्न करतात.
6 / 7
तेजपान खाल्ल्यानंतर त्याच्या वासामुळे उंदीर अस्वस्थ होतात आणि त्या जागेवरून निघून जातात.
7 / 7
याशिवाय आणखी एक उपायही करू शकता. उंदीर मारण्यासाठी तुम्ही जे औषण आणलेलं असेल त्यावर थोडं तूप घाला आणि ते जिथे उंदीर जास्त फिरतात तिथे ठेवून द्या. तुपाच्या वासामुळे आकर्षित होऊन उंदीर ते विषारी औषध लवकर खातील.
टॅग्स : सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडी