मुसळधार पावसात दरवाजे - खिडक्या फुगून गच्च झाल्या? ६ ट्रिक्स- सहज उघडतील, घासलंही जाणार नाही...

Updated:August 19, 2025 19:14 IST2025-08-19T18:55:37+5:302025-08-19T19:14:33+5:30

How To Get Rid Of Jammed Window Door In Rainy Season : Tips & Tricks To Get Rid Of Jammed Window Door In Rainy Season : These 6 Simple Tricks Is Helpful To Get Rid Of Jammed Window Door In Rainy Season : पावसाळ्यात दारं - खिडक्या जाम गच्च होतात यासाठी करा घरगुती ६ सोपे उपाय...

मुसळधार पावसात दरवाजे - खिडक्या फुगून गच्च झाल्या? ६ ट्रिक्स- सहज उघडतील, घासलंही जाणार नाही...

पावसाळ्याला सुरुवात झाली की, पावसाळा येतानाच आपल्यासोबत (How To Get Rid Of Jammed Window Door In Rainy Season) अनेक समस्या घेऊन येतो. यातील एक प्रमुख समस्या म्हणजे लाकडी दरवाजे आणि (Tips & Tricks To Get Rid Of Jammed Window Door In Rainy Season) खिडक्या फुगणे. सततच्या ओलाव्यामुळे लाकूड फुगते आणि त्यामुळे दरवाजे-खिडक्या बंद करायला किंवा उघडायला खूप त्रास होतो. इतकंच नाही तर त्यातून करकर असा आवाजही येतो. पावसाळ्यातील या नेहमीच्या कॉमन समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही साधेसोपे घरगुती उपाय फायदेशीर ठरु शकतात.

मुसळधार पावसात दरवाजे - खिडक्या फुगून गच्च झाल्या? ६ ट्रिक्स- सहज उघडतील, घासलंही जाणार नाही...

१. लाकडी दरवाजे आणि खिडक्यांच्या बिजागरांमध्ये अनेकदा ओलाव्यामुळे गंज चढतो किंवा घर्षण होते, ज्यामुळे सतत दरवाजे - खिडक्यांमधून कुरकुर असा आवाज येऊ लागतो. यावर आपण घरात उपलब्ध असलेले मोहरीचे किंवा खोबरेल तेल वापरू शकता. कापूस किंवा ब्रशच्या मदतीने तेल बिजागरांमध्ये लावून घ्यावे. त्यामुळे सतत कुरकुर असा आवाज येणे बंद होईल.

मुसळधार पावसात दरवाजे - खिडक्या फुगून गच्च झाल्या? ६ ट्रिक्स- सहज उघडतील, घासलंही जाणार नाही...

२. पावसाळ्याच्या दिवसांत लाकडामध्ये ओलावा शिरतो, त्यामुळे लाकूड फुगते. यामुळे दरवाजे - खिडक्या अगदी गच्च बसतात. यावर एक सोपा उपाय म्हणजे पेट्रोलियम जेलीचा वापर करणे. दरवाजे किंवा खिडकीच्या कडांवर बोटाने थोडीशी पेट्रोलियम जेली पसरवून लावा.

मुसळधार पावसात दरवाजे - खिडक्या फुगून गच्च झाल्या? ६ ट्रिक्स- सहज उघडतील, घासलंही जाणार नाही...

३. पेट्रोलियम जेली प्रमाणेच आपण मेणबत्तीच्या मेणाचा देखील वापर करु शकता. फुगलेल्या लाकडाच्या दरवाजे - खिडक्यांवर मेणबत्तीचे मेण घासून लावू शकता. हे मेण ओलावा आत जाण्यापासून थांबवते आणि दरवाजा सहज उघड-बंद होण्यास मदत करते.

मुसळधार पावसात दरवाजे - खिडक्या फुगून गच्च झाल्या? ६ ट्रिक्स- सहज उघडतील, घासलंही जाणार नाही...

४. पावसाळ्यात दरवाजे - खिडक्यांचा काही भाग फुगलेला असल्यास हलक्या सँडपेपरने घासल्याने दरवाजा सहजपणे उघड - बंद करता येतो.

मुसळधार पावसात दरवाजे - खिडक्या फुगून गच्च झाल्या? ६ ट्रिक्स- सहज उघडतील, घासलंही जाणार नाही...

५. टॅल्कम पावडर किंवा बोरिक पावडर दरवाज्याच्या बिजगारांवर तसेच दरवाजे - खिडक्या ज्या भागात फुगलेले आहेत त्या भागावर शिंपडल्याने आवाज कमी होतो तसेच दरवाजे - खिडक्यांची उघड - झाप करणे देखील सहजसोपे होते.

मुसळधार पावसात दरवाजे - खिडक्या फुगून गच्च झाल्या? ६ ट्रिक्स- सहज उघडतील, घासलंही जाणार नाही...

६. लाकडी दरवाजे-खिडक्यांना वार्निश लावल्याने पावसाळ्यातील ओलावा कमी प्रमाणात शोषला जातो. यामुळे लाकडी दरवाजे - खिडक्या ओलाव्याने फुगत नाहीत, परिणामी त्यांची उघडझाप करणे सोपे होते.