Join us
Daily Top 2 Weekly Top 5

चिमूटभर कापूर- चमचाभर कपडे धुण्याची पावडर, पाहा झुरळं पळवण्याचा जालीम उपाय! घरात एक झुरळ दिसणार नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2025 15:41 IST

1 / 6
घरात झालेल्या झुरळांमुळे तुम्ही जर वैतागला असाल तर पुढे सांगितलेला एक घरगुती उपाय करून पाहा.
2 / 6
हा उपाय केल्याने झुरळं तर कमी होतीलच पण पाली आणि उंदीरही तुमच्या घरापासून लांब पळतील.(how to get rid of cockroaches?)
3 / 6
हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही डांबर गोळ्या लागणार आहेत. २ ते ३ डांबर गोळ्या घ्या आणि त्या ठेचून त्यांची पावडर करून घ्या.(home hacks to keep cockroach away from house)
4 / 6
आता या पावडरमध्ये कापुराच्या ४ ते ५ वड्या चुरून टाका. कापुराच्या वासानेही झुरळं दूर पळतात.
5 / 6
यानंतर त्यामध्ये डिटर्जंट पावडर आणि झुरळं मारण्यासाठी बाजारात जो खडू मिळतो त्या खडूची थोडी पावडर टाका.
6 / 6
फिनेल घालून हे सगळे पदार्थ कालवून घ्या आणि जिथे जिथे झुरळं जास्त फिरताना दिसतात तिथे तिथे ही पेस्ट लावून टाका. २ ते ३ दिवसांतून एकदा हा उपाय करा. काही दिवसांतच झुरळं घरातून पळून जातील. हा उपाय prajakta_salve_official या इंस्टाग्राम पेजवर सुचविण्यात आला आहे.
टॅग्स : स्वच्छता टिप्ससोशल व्हायरलहोम रेमेडी