1 / 5आपण आपल्या स्वयंपाक घरात व्यवस्थित स्वच्छता पाळतो. पण तरीही सिंक हा स्वयंपाक घरातला असा एक भाग असतो तो बऱ्याचदा अस्वच्छ राहातो.2 / 5सिंक आपण अगदी रोजच स्वच्छ घासतो. पण तरीही कधी कधी त्यातून खूपच दुर्गंधी येते. याचं कारण म्हणजे सिंकचा फक्त बाह्य भाग स्वच्छ होतो. पण सिंकच्या पाईपमध्ये जी घाण अडकलेली असते ती तशीच राहाते आणि कुजते. त्यामुळे सिंक घासूनही त्यातून दुर्गंधी येतच असते.3 / 5म्हणूनच आता सिंकमधून येणारी दुर्गंधी घालविण्यासाठी काय उपाय करता येईल ते पाहूया.. यासाठी आपल्याला बर्फाचे काही तुकडे लागणार आहेत.4 / 5बर्फाचे तुकडे सिंकमध्ये टाका. त्या तुकड्यांवर १ चमचा बेकिंग सोडा घाला आणि मग १० ते १२ सेकंदांनी त्यावर ग्लासभर गरम पाणी टाका.5 / 5हा उपाय केल्यामुळे सिंकच्या पाईपमध्ये अडकून बसलेली घाण निघून जाईल आणि ते स्वच्छ होईल. त्यामुळे दुर्गंधीही कमी होईल. आठवड्यातून एकदा तरी हा उपाय करायलाच हवा.