मुंग्यांनाही लावा थोडीशी टाल्कम पावडर! घरातून मुंग्यांना घालवून टाकण्यासाठी भन्नाट देसी जुगाड...
Updated:July 29, 2025 13:58 IST2025-07-29T13:53:03+5:302025-07-29T13:58:12+5:30

कधी कधी घरात खूप मुंग्या होतात. एकदा घरातल्या मुंग्या वाढल्या की मग त्या कशा कमी कराव्या हा प्रश्नच पडतो.
घरात जर लहान मुलं असतील तर मुंग्यांसाठी बाजारात मिळणारे किटकनाशकं फवारायलाही नको वाटते. कारण मुलांसाठी ते धोकादायक ठरू शकतं.
अशावेळी हा एक अगदी सोपा घरगुती उपाय करून पाहा. हा उपाय केल्यामुळे घरातल्या मुंग्या नक्कीच कमी होतील. हा उपाय अतिशय वेगळा असून तो सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा आपली नेहमीची टाल्कम पावडर लागणार आहे.
त्यासोबतच एक चमचा हळदही लागणार आहे. हळद आणि टाल्कम पावडर दोन्ही एकत्र करा आणि तव्यावर घालून चांगली भाजून घ्या.
यानंतर ही पावडर थंड होऊ द्या आणि घरात ज्या ठिकाणी मुंग्या जास्त प्रमाणात फिरताना दिसतात, त्याठिकाणी दिवसातून दोन वेळा शिंपडा. हळूहळू घरातल्या मुंग्या तर गायब होतीलच, पण पावडरमुळे घरभर मंद सुगंध दरवळत राहील.