साखरेचा डबा की मुंग्यांचं वारुळ? ५ भन्नाट ट्रिक्स, साखरेच्या डब्यांभोवतीच्या मुंग्याच्या रांगा होतील गायब
Updated:July 16, 2025 13:47 IST2025-07-16T12:48:45+5:302025-07-16T13:47:48+5:30
How to get rid of ants from sugar jar: साखरेच्या डब्यातून मुंग्या काढणंही अवघड असतं. काही सोपे उपाय..

How to get rid of ants from sugar jar: पावसाळ्यात माश्या, डास आणि चिलटांसोबतच मुंग्यांचा त्रासही वाढतो. घरात सगळीकडे मुंग्या फिरताना दिसतात. मुंग्या सगळ्यात जास्त गोड पदार्थांजवळ जातात. अनेकदा तर साखरेच्या डब्यात मुंग्या शिरतात. साखरेच्या डब्यातून या मुंग्या काढणंही अवघड असतं. अशात या मुंग्या डब्यात शिरूच नये यासाठी काही सोपे उपाय करू शकता.
सगळ्यात आधी तर या गोष्टीकडे लक्ष द्या की, घरात मुंग्या कशामुळे आल्या. किचन स्वच्छ नसल्यानं मुंग्या वाढल्या का? की गोड वासामुळे मुंग्या आल्या? याचा पत्ता लावा.
मुंग्या घरात येऊ नये असं वाटत असेल तर किचनचा कोनाकोपरा स्वच्छ ठेवा. लादी डेटॉल टाकून साफ करा. जर पाण्यात डेटॉल आणि लिंबाचा रस टाकून लादी पुसल्यास फायदा अधिक मिळतो.
त्यानंतर हे याची खात्री पटवा की, ज्या डब्यात साखर ठेवली आहे तो एअरटाइट आहे की नाही. जर एअरटाइट नसेल तर तसा डबा घ्या. जर डबा जुना झाला असेल तर बदला. डब्याची स्वच्छताही महत्वाची.
जर या सगळ्या गोष्टी केल्यावरही मुंग्या येत असतील तर साखरेच्या डब्यात तुळशीची काही पानं ठेवा. तुळशीच्या पानांचा गंध मुंग्यांना पसंत नसतो. त्यामुळे त्या डब्यात पुन्हा येणार नाहीत. सोबतच कडूलिंबाची पानंही यात ठेवू शकता.
जर साखरेच्या डब्यात मुंग्या येत असतील तर त्यात तीन ते चार लवंग ठेवा. साखरेच्या आत लवंग खोचून ठेवा. मुंग्या येणार नाहीत.
लवंग सोबतच साखरेच्या डब्यात आपणं तमालपत्रही ठेवू शकता. तमालपत्राचा गंध मुंग्यांना आवडत नाही. तसेच डब्याच्या चारही बाजूने लिंबाचा रस टाकून ठेवा. हवं तर बोरिक पावडरही आजूबाजूला टाकू शकता.