रणरणत्या उन्हातही घर राहील थंडगार पाहा १० टिप्स - वीजबील येईल कमी, घर राहील ठंडाठंडा - कूलकूल...

Updated:March 14, 2026 18:20 IST2026-03-14T18:15:40+5:302026-03-14T18:20:01+5:30

How To Cool a Home Naturally In Summer : natural home cooling tips in summer : उन्हाळ्यातही नैसर्गिकरीत्या आणि कमी खर्चात घर थंडगार ठेवायचे असेल तर घरगुती उपाय...

रणरणत्या उन्हातही घर राहील थंडगार पाहा १० टिप्स - वीजबील येईल कमी, घर राहील ठंडाठंडा - कूलकूल...

उन्हाळ्याच्या सिझनमध्ये ऊन जसजसे कडकडीत होऊन वाढू लागते, तसे त्याचा त्रास (simple tricks to keep house cool during summer season) होऊ लागतो. कडाक्याच्या उन्हांत गरम झळा लागताच नकोसं वाटू लागत. या कडक उन्हाचा बाहेर तर त्रास होतोच शिवाय घरात देखील त्याचा तितकाच (tips to keep house cool in extreme heat) त्रास होतो. दिवसभर कडक उन्हामुळे घराच्या भिंती आणि छत तापतात, त्यामुळे घरातही गरम वातावरण जाणवते.

रणरणत्या उन्हातही घर राहील थंडगार पाहा १० टिप्स - वीजबील येईल कमी, घर राहील ठंडाठंडा - कूलकूल...

प्रत्येक घरात एसी किंवा कूलर असतोच असे नाही, आणि सतत त्यांचा वापर करणेही खर्चिक ठरू शकते. इतकंच नाही तर अनेकजण घर थंड ठेवण्यासाठी एसी किंवा कुलरचा आधार घेतात, पण यामुळे विजेचे बिल खिशाला कात्री लावते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला नैसर्गिकरीत्या आणि कमी खर्चात घर थंडगार ठेवायचे असेल, तर काही साध्या घरगुती टिप्स फायदेशीर ठरु शकतात. कडाक्याच्या उन्हाळ्यात घर थंडगार ठेवण्यासाठी सोप्या आणि फायदेशीर टिप्स पाहूयात.

रणरणत्या उन्हातही घर राहील थंडगार पाहा १० टिप्स - वीजबील येईल कमी, घर राहील ठंडाठंडा - कूलकूल...

उन्हाळ्यातील सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत घरातील सर्व खिडक्या आणि पडदे लावून घ्यावेत. यामुळे बाहेरची गरम हवा घरात येत नाही आणि घराचे तापमान ३ ते ४ अंशांनी कमी राहते. यासोबतच, सकाळी लवकर आणि रात्री वातावरण थंड असते. त्या वेळी खिडक्या उघड्या ठेवल्यास घरातील गरम हवा बाहेर पडते.

रणरणत्या उन्हातही घर राहील थंडगार पाहा १० टिप्स - वीजबील येईल कमी, घर राहील ठंडाठंडा - कूलकूल...

दुपारी छत खूप तापते. संध्याकाळी छतावर पाणी शिंपडल्यास तापमान कमी होण्यास मदत होते आणि घर थंडगार राहाते. यासोबतच, जर तुम्ही टॉप फ्लोअरला राहत असाल, तर घराच्या छतावर पांढरा 'रिफ्लेक्टीव्ह' पेंट किंवा चुना लावावा. पांढरा रंग सूर्यप्रकाश परावर्तित (Reflect) करतो, ज्यामुळे छतं कमी तापतात.

रणरणत्या उन्हातही घर राहील थंडगार पाहा १० टिप्स - वीजबील येईल कमी, घर राहील ठंडाठंडा - कूलकूल...

कोरफड, स्नेक प्लांट, मनी प्लांट किंवा अरेका पाम यांसारखी झाडे घरात लावा. ही झाडे केवळ ऑक्सिजनच देत नाहीत, तर घरातील ओलावा टिकवून हवा थंड ठेवण्यास मदत करतात.

रणरणत्या उन्हातही घर राहील थंडगार पाहा १० टिप्स - वीजबील येईल कमी, घर राहील ठंडाठंडा - कूलकूल...

उन्हाळ्यात सोफा कव्हर्स, बेडशीट्स आणि पडदे हे जाड किंवा सिल्कचे नसावेत. हलक्या रंगाचे, सुती कापड वापरा. सुती कापड उष्णता शोषून घेत नाही आणि शरीराला थंडावा देते. इतकंच नाही तर, उन्हाळ्यात पांढरे किंवा हलक्या रंगांचे पडदे, चादरी आणि बेडशीट वापरल्यास उष्णता कमी जाणवते.

रणरणत्या उन्हातही घर राहील थंडगार पाहा १० टिप्स - वीजबील येईल कमी, घर राहील ठंडाठंडा - कूलकूल...

सूर्यास्त झाल्यानंतर रात्रीच्या वेळी घराच्या सर्व खिडक्या उघडून द्या. यामुळे घरातील गरम हवा बाहेर जाऊन रात्रीची थंड हवा खेळती राहते. दुपारी घरे बंद ठेवा, पण संध्याकाळी समोरासमोरच्या खिडक्या उघडा. यामुळे हवेचा प्रवाह (Cross Ventilation) तयार होतो, जो घरातील भिंतींची उष्णता लवकर कमी करतो.

रणरणत्या उन्हातही घर राहील थंडगार पाहा १० टिप्स - वीजबील येईल कमी, घर राहील ठंडाठंडा - कूलकूल...

जर खूप उकाडा होत असेल, तर खिडकीवर पाण्यांत भिजवलेला ओला पडदा किंवा ओली चादर लटकवा. खिडकीतून येणारी हवा या ओलाव्यामुळे नैसर्गिकरित्या थंड होऊन घरात येईल.

रणरणत्या उन्हातही घर राहील थंडगार पाहा १० टिप्स - वीजबील येईल कमी, घर राहील ठंडाठंडा - कूलकूल...

बल्ब, ट्युबलाईट किंवा कॉम्प्युटर यांमधून उष्णता बाहेर पडते. उन्हाळ्यात गरज नसेल तेव्हा घरातील लाईट्स बंद ठेवा. शक्य असल्यास पिवळ्या बल्बऐवजी एलईडी (LED) बल्बचा वापर करा.

रणरणत्या उन्हातही घर राहील थंडगार पाहा १० टिप्स - वीजबील येईल कमी, घर राहील ठंडाठंडा - कूलकूल...

शक्यतो टेबल फॅनजवळ बर्फाने भरलेल भांडं किंवा थंड पाण्याचं पातेलं ठेवल्यास हवा अधिक थंड वाटते.

रणरणत्या उन्हातही घर राहील थंडगार पाहा १० टिप्स - वीजबील येईल कमी, घर राहील ठंडाठंडा - कूलकूल...

दुपारच्या वेळी स्वयंपाकघरातील किंवा बाथरूममधील एक्झॉस्ट फॅन चालू ठेवू नका, कारण ते घरातील थंड हवा बाहेर खेचतात. मात्र, सूर्यास्त झाल्यावर एक्झॉस्ट फॅन चालू केल्यास घरातील साचलेली उष्ण हवा झपाट्याने बाहेर जाण्यास मदत होते.

रणरणत्या उन्हातही घर राहील थंडगार पाहा १० टिप्स - वीजबील येईल कमी, घर राहील ठंडाठंडा - कूलकूल...

उन्हाळ्यात दिवसातून दोनदा फरशी पुसा. फरशी पुसण्याच्या पाण्यात थोडे खडे मीठ किंवा कापूर टाका. ओल्या फरशीमुळे जमिनीचा थंडावा वाढतो आणि हवेत आर्द्रता निर्माण होते.