गॅस संपायच्या भीतीने इंडक्शन वापरताय पण टाळा ‘या’ चुका, शॉर्ट सर्किट होऊन व्हायचा भडका
Updated:March 17, 2026 15:00 IST2026-03-16T15:40:54+5:302026-03-17T15:00:01+5:30
Induction Using Tips : इंडक्शनचा वापर करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जर योग्य वापर केला नाही तर ओव्हरहीटिंग, ग्लासचं नुकसान, इलेक्ट्रिकल समस्या किंवा आग लागण्यासारख्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे काही गोष्टी फॉलो करणं आवश्यक असतं. त्या कोणत्या ते पाहुयात.

Induction Using Tips : सध्या गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे किचनमध्ये गॅस स्टोवची जागा इंडक्शन कुकटॉपने घेतली आहे. घरातील सगळा स्वयंपाक यावरच केला जात आहे. यावर स्वयंपाक करायला जरा जास्त लागतो, पण लोकांकडे पर्याय नाही. पण इंडक्शनचा वापर करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जर योग्य वापर केला नाही तर ओव्हरहीटिंग, ग्लासचं नुकसान, इलेक्ट्रिकल समस्या किंवा आग लागण्यासारख्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे काही गोष्टी फॉलो करणं आवश्यक असतं. त्या कोणत्या ते पाहुयात.
योग्य भांड्यांची निवड - इंडक्शन कुकटॉपवर तिच भांडी काम करतात, ज्यांमध्ये फेरोमॅग्नेटिक मटेरिअल असतं. जसे की, कास्ट आयर्न किंवा मॅग्नेटिक स्टेनलेस स्टील. जर मॅग्नेट भांड्यांच्या खाली चिकटलं तर ते इंडक्शनर वापरलं जाऊ शकतं.
भांडी बरोबर जागी ठेवा - कुकटॉप ऑन करण्याआधी भांडं हीटिंग झोनच्या मधे ठेवा. असं केल्याने हीट बरोबर पसरत आणि जेवण लवकर तयार होतं. त्याशिवाय हीटिंग झोनच्या हिशेबाने भांडी निवडा. म्हणजे भांड्याचा बेस हीटिंग झोनच्या साइजचा असावा. कुकीच्या साइजचं भांड वापरलं तर शिजण्याची क्षमता कमी होऊ शकते.
वापरल्यानंतर स्वच्छता - कुकटॉप बंद केल्यावर आणि रेजिडुअल हीट इंडिकेटर बंद झाल्यावर ग्लासचा पृष्ठभाग व्यवस्थित साफ करा. यासाठी मुलायम कपडा आणि खास कुकटॉप क्लीनरचा वापर करा.
कोणत्या चुका टाळाव्यात? १ - चुकीच्या मटेरिअलच्या भांड्याचा वापर करू नका. अॅल्यूमिनिअम, कॉपर, ग्लास किंवा सिरेमिक भांडी इंडक्शनवर काम करत नाहीत. मॅग्नेटिक बेस असलेली भांडीच अधिक फायदेशीर ठरतात.
२ - धातुच्या वस्तू ठेवू नका - चमचा, चाकू, फोर्क, झाकण किंवा अॅल्यूमिनिअम फॉइलसारख्या गोष्टी कुकटॉपवर ठेवल्यास त्या गरम होऊ शकतात. ३ - भांडी घासू नका - कुकटॉपच्या ग्लासवर भांडी घासल्याने स्क्रॅच पडू शकतात.
४ - व्हेंटिलेशन ब्लॉक करू नका - कुकटॉपखाली किंवा मागे असलेल्या एअर वेंटला कधीच बंद करू नका. याने मशीन ओव्हरहीट होऊ शकते. ५ - तुटलेला ग्लासचा वापर टाळा - जर कुकटॉपचा ग्लास क्रॅक झाला असेल तर त्याचा वापर लगेच बंद करा. याने विजेचा झटका बसण्याचा धोकाही असतो.