1 / 7आपल्यापैकी काहीजणी सोन्याचा बांगड्या नेहमी घालतात (Tips & Tricks Shine Gold Bracelets At Home In Minutes With This Tricks) तर काहीजणी फक्त सणवार, खास प्रसंगीच घालतात. या सोन्याच्या बांगड्यांची (How To Clean Your Gold Bangles At Home) चकाकी किंवा सोनेरी तेज दिसलं तरच त्या हातात घालायला अगदी शोभून दिसतात. 2 / 7अनेकदा दररोजच्या वापराने या बांगड्यांची चमक थोडी ( How to Clean Gold Jewellery) कमीच होते. अशावेळी आपण या सोन्याच्या बांगड्या पॉलिश करून नव्यासारख्या लख्ख करतो. परंतु आपण पॉलिश न करता घरच्याघरीच सोन्याच्या बांगड्या अगदी मिनिटभरात लख्ख करु शकतो. 3 / 7सोन्याच्या बांगड्या पॉलिश न करताच नव्यासारख्या लख्ख आणि त्यांची सोनेरी चमक पुन्हा आणण्यासाठी काही खास टिप्स पाहूयात. 4 / 7१. एका मोठ्या बाऊलमध्ये प्रत्येकी अर्धा कप पाणी आणि व्हिनेगर घेऊन दोन्ही एकत्रित करून घ्यावे. आता या तयार द्रावणात सोन्याच्या बांगड्या १५ ते २० मिनिटे भिजत ठेवाव्यात. त्यानंतर एखाद्या जुन्या टूथब्रशच्या मदतीने या बांगड्या हलकेच घासून स्वच्छ करून घ्याव्यात. मग स्वच्छ पाण्याने बांगड्या पुन्हा एकदा धुवून घ्याव्यात. या उपायामुळे सोन्याच्या बांगड्या अगदी नव्यासारख्या लख्ख दिसतील. 5 / 7२. एका मोठ्या बाऊलमध्ये अर्धा कप व्हिनेगर घेऊन त्यात १ टेबलस्पून बेकिंग सोडा घालावा. आता या तयार द्रावणात सोन्याच्या बांगड्या २ ते ३ तास भिजत ठेवाव्यात. त्यानंतर या बांगड्या पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून सुती कापडाने पुसून घ्याव्यात. 6 / 7३. बाऊलमध्ये थोडीशी टूथपेस्ट घेऊन त्यात चमचाभर पाणी घालून या मिश्रणाची पेस्ट तयार करून घ्यावी. या तयार पेस्टमध्ये ब्रश किंवा सुती कापड भिजवून त्याने सोन्याच्या बांगड्या स्वच्छ करून घ्याव्यात. त्यानंतर बांगड्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्याव्यात. 7 / 7४. एक कप पाण्यांत अमोनियाचे ३ ते ४ थेंब घालून मिश्रण तयार करून घ्यावे. तयार मिश्रणात सोन्याच्या बांगड्या १५ ते २० मिनिटे भिजत ठेवाव्यात. त्यानंतर ब्रशने हलकेच घासून स्वच्छ कराव्यात. मग स्वच्छ पाण्याचे धुवून घ्याव्यात.