Join us

टॉयलेट सीटवर पडलेले पिवळे डाग २ मिनिटांत निघून जातील! 'हा' पदार्थ वापरून करा स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2025 16:32 IST

1 / 6
बऱ्याच जणांच्या घरात असं दिसून येतं की टॉयलेट सीट पुर्णपणे पिवळट झालेलं दिसतं. आतूनही अनेक पिवळे डाग असतात.(how to clean yellow stains on toilet seat?)
2 / 6
या डागांकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर ते डाग वाढत जातात आणि काढून टाकणं अवघड होऊन जातं.(simple home hacks to clean toilet stains)
3 / 6
त्यामुळे अगदी वेळीच त्यांची स्वच्छता करा. बऱ्याच जणींना हे काम खूप मेहनतीचं आणि वेळखाऊ वाटतं. त्यामुळेच आता हा एक सोपा उपाय पाहून घ्या..
4 / 6
टॉयलेट सीटवर आलेला पिवळटपणा कमी करण्यासाठी व्हिनेगर खूप उपयुक्त ठरतं.
5 / 6
हा उपाय करण्यासाठी २ कप व्हिनेगर अर्धा कप पाण्यात मिसळा. हे पाणी आता टॉयलेट सीटवर १ मिनिटासाठी टाकून ठेवा.
6 / 6
त्यानंतर ब्रशने टॉयलेट घासून काढा. पिवळेपणा जाऊन टॉयलेट अगदी स्वच्छ झालेलं दिसेल. डाग पुर्णपणे निघून गेले नाही तर हा उपाय आणखी एकदा करून पाहा..
टॅग्स : सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडी