1 / 8आपल्या घरातलं टॉयलेट सीट इंडियन असू देत किंवा वेस्टर्न पण हे साफ नसलं तर आरोग्याच्या अनेक तक्रारी वाढतात. टॉयलेट सीटवर कायम काळे किंवा पिवळे डाग साचतात. यावर कितीही डिटर्जंट किंवा महागतल्या केमिकल्सचा वापर केला तरी स्वच्छ होत नाही. (Toilet cleaning hacks)2 / 8टॉयलेट सीट इतकी घाण दिसते की, आपल्याला बाथरुममध्ये जाण्याची देखील इच्छा होत नाही. जर आपल्याही घरातील टॉयलेट सीटवर काळे किंवा पिवळे थर साचले असतील तर चमचाभर कॉफीचा हा सोपा उपाय करुन पाहा.(Coffee powder cleaning) 3 / 8अनेकदा आपण कॉफी पावडरपेक्षा तिच्या बियांचा वापर करुन कॉफी पितो. पण या उरलेले कॉफी ग्राउंड्स निरुपयोगी समजून कचऱ्यात फेकून देत असू तर थांबा, याचा वापर आपले बाथरुम स्वच्छ करण्यासाठी वापरु शकतो. 4 / 8कॉफी आपले टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी नैसर्गिक स्क्रबर आहे. शौचालये स्वच्छ करण्यासाठी आपण अनेकदा रसायने आणि ब्लीचचा वापर करतो. 5 / 8टॉयलेटमध्ये चमचाभर कॉफी ग्राउंड्स घाला आणि ब्रशने घासून घ्या. हलके डाग आणि घाण निघून जाण्यास मदत होईल. 6 / 8कॉफीमध्ये असलेले नैसर्गिक तेले आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म केवळ स्वच्छता करण्यास मदत करत नाहीत तर शौचालयात साचलेला वास देखील दूर करतात. 7 / 8घराबाहेर जात असाल तर जाण्यापूर्वी शौचालयात एक चमचा कॉफी ग्राउंड्स टाका. जेव्हा घर बरेच दिवस बंद असते तेव्हा बाथरूममधून वास येतो. अशावेळी कॉफीमुळे घरातील दुर्गंध कमी होईल. 8 / 8कॉफी प्याल तेव्हा उरलेली पावडर फेकून देण्याऐवजी, शौचालय स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे घरातील टॉयलेट सीट नव्यासारखी चमकेल.