1 / 8गौरी- गणपतीचे दिवस आता जवळ आले आहेत. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत छान छान दागिने, साड्या, पारंपरिक कपडे घालून सजणं ओघाने आलंच..2 / 8म्हणूनच या दिवसांत घालण्यासाठी चांदीचे दागिने अगदी आतापासूनच स्वच्छ करून ठेवा. म्हणजे मग कधीही वेळ आली की छान चमकदार दागिने अगदी झटपट घालता येतील.3 / 8हा उपाय करून तुम्ही चांदीचे पैंजन, गळ्यातल्या माळा, साखळ्या, कानातले , बांगड्या असे चांदीचे वेगवेगळे दागिने स्वच्छ करू शकता.4 / 8हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवर एक तवा गरम करायला ठेवा. तवा गरम झाल्यानंतर त्यावर चांदीचे दागिने टाका.5 / 8आता गरम तव्यावर चांदीचे दागिने घातल्यानंतर ते थोडे हलवा जेणेकरून ते सगळीकडून गरम होतील.6 / 8आता गरम तव्यावर आणि गरम झालेल्या दागिन्यांवर कोणतेही सोडा असणारे सॉफ्ट ड्रिंक घाला. 7 / 8सॉफ्ट ड्रिंकऐवजी तुम्ही त्यावर बेकिंग साेड्याचं पाणीही घालू शकता. या पाण्यामध्ये चांदीचे दागिने चांगले बुडायला हवे. साधारण २ ते ३ मिनिटांनी दागिने तव्यावरून खाली घ्या. आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.8 / 8काळे पडलेले चांदीचे दागिने अगदी नव्यासारखे लख्खं चमकलेले दिसतील.