Join us

सिल्कच्या साड्या घरी धुण्याची सोपी ट्रिक, रंगही राहिल नव्यासारखा- ड्राय क्लिनिंगची गरज पडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2025 18:05 IST

1 / 7
सध्या लग्न सराईचा सिझन सुरु असल्यामुळे आपल्या फॅशनमध्ये भर पडाण्यासाठी आपण महगाड्या साड्या खरेदी करतो. कोणतेही युग असो किंवा कोणतीही फॅशन असो साडी नेसण्याचा ट्रेंड कधीही जाणार नाही. (Wash silk saree at home safely)
2 / 7
आपण खास फंक्शन किंवा सणांसाठी साडी नेसतो. कितीही छान वाटत असली तर नंतर साडी खराब झाल्यावर बाहेरुन ड़्राय क्लीन करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात. परंतु, काही सोप्या ट्रिक्सच्या मदतीने आपण घरच्या घरी साडी धुऊ शकतो. (Tips for cleaning delicate clothes at home)
3 / 7
सिल्क साडी एकदा नेसल्यानंतर लगेच धुवू नका. चार ते पाच वेळा घातल्यानंतर धुवा. तर चांगले राहिल.
4 / 7
संत्र्याची सालीने साडीची काळी झालेली बॉर्डर आपल्याला साफ करता येईल. त्यासाठी संत्र्याची साल बॉर्डरवर चोळून घ्या, नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
5 / 7
लिंबूमध्ये सायट्रिक अॅसिड असते. स्लिक साडीची काळी झालेली बॉर्डर साफ करण्यासाठी लिंबू फार उपयुक्त ठरते. यासाठी आपल्याला एका भांड्यात लिंबाचा रस काढून घ्या.
6 / 7
सिल्कची साडी धुण्यासाठी नेहमी थंड पाण्याचा वापर करा. अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा.
7 / 7
दोन चमचे व्हिनेगर घालून पाण्यात मिसळा त्यानंतर साडी १५ मिनिटे भिजवून ठेवा. व्हिनेगरचा वापर आपण योग्य प्रमाणात करा, अन्यथा साडी खराब होण्याची शक्यता अधिक आहे.
टॅग्स : सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स