प्लास्टिकच्या खुर्च्या खूपच जुनाट, मळकट दिसू लागल्या? 'या' पद्धतीने पुसा- नव्यासारख्या स्वच्छ दिसतील
Updated:September 15, 2025 09:30 IST2025-09-15T09:25:50+5:302025-09-15T09:30:06+5:30

प्लास्टिकच्या खुर्च्या वापरायला सोप्या आणि दणकट असल्यामुळे जवळपास प्रत्येक घरातच त्या दिसतात.
पण त्या खुर्च्या जर पिवळट किंवा पांढरट रंगाच्या असतील तर मात्र काही दिवसांत त्यांच्यावर पिवळट डाग दिसू लागतात. बऱ्याचदा तर त्या काळवंडून जातात आणि अगदी मळकट दिसू लागतात.
म्हणूनच या खुर्च्या नेहमीच स्वच्छ ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून दोनदा त्या पुढील पद्धतीने धुतल्या पाहिजेत.
एक वाटी पाणी आणि पाऊण वाटी व्हिनेगर एकत्र करा आणि या पाण्याने प्लास्टिकच्या खुर्च्या महिन्यातून एकदा पुसून काढा. यामुळे त्यांचा रंग कळकट दिसणार नाही.
दुसरा उपाय म्हणजे एक वाटी गरम पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये १ चमचा मीठ आणि १ चमचा डिटर्जंट पावडर घाला. आता हे पाणी खुर्चीवर टाकून घासणीने खुर्ची घासून काढा. ती अगदी स्वच्छ होईल.