1 / 6आपल्यापैकी अनेकांच्या घरात मिक्सरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. वाटण करताना किंवा कोणताही पदार्थ बारीक करण्यासाठी याचा वापर होतो. अशावेळी आपण मिक्सरचे भांडे स्वच्छ तर करतो, पण त्याचा तळ मात्र काही स्वच्छ करत नाही. (mixer grinder cleaning)2 / 6मिक्सर जार धुताना बहुतेक लोक तळ स्वच्छ करायला विसरतात. कारण हे स्वच्छ करणं खूप कठीण असतं. अनेकदा याकडे आपण दुर्लक्ष करतो, ज्यामुळे घाण जास्त प्रमाणात साचून त्यावर काळाकुट्ट आणि चिकट थर साचतो.पण या सोप्या टिप्स फॉलो केल्यातर ग्राइंडर स्वच्छ होण्यास मदत होईल. (kitchen cleaning hacks)3 / 6सगळ्यात आधी आपल्याला ब्लेंडर जारच्या तळाला १ चमचा बेकिंग सोडा घाला. मग त्यावर व्हिनेगर घाला आणि या मिश्रणाला ५ मिनिटे तसेच राहू द्या. 4 / 6मग त्यात डिशवॉश टाका. काट्याच्या चमच्याने टिशू पेपरचे चार तुकडे करुन त्याला दुमडा आणि ग्राइंडरच्या खालच्या बाजूने क्लिन करा. 5 / 6त्यानंतर ग्राइंडरच्या खालच्या बाजूला चारही बाजूंनी घासा यामुळे टिश्यू पेपरवर सगळी घाण चिकटेल. 6 / 6ग्राइंडरचा चिकटपणा घालवण्यासाठी आपल्याला ब्रशच्या मदतीने घासाव लागेल. त्यानंतर पाण्याच्या मदतीने धुवा, यामुळे भांड नव्यासारखं चमकेल.