घरातलं फर्निचर 'या' पद्धतीने पुसा, वारंवार पुसण्याची गरजच नाही-८ दिवस राहील स्वच्छ चकाचक
Updated:January 17, 2026 18:02 IST2026-01-16T11:44:50+5:302026-01-17T18:02:01+5:30

घरात फर्निचर असलं की घराला खूप छान लूक येतो, हे अगदी खरं आहे. पण ते मेंटेन ठेवणंही खूप गरजेचं असतं.(simple tips to clean furniture at home)
त्यामुळेच तर ते वारंवार पुसावं लागतं. अगदी एक दिवसाआड घरातल्या फर्निचरवरून कपडा फिरवावाच लागतो (how to clean furniture at home?). नाहीतर लगेच त्यावर धूळ जमा होते.(how to make furniture dust free?)
आता तुमचं हे काम सोपं करण्यासाठी पुढे सांगितलेला एक उपाय करून पाहा. हा उपाय करून जर तुम्ही फर्निचर पुसलं तर पुढे ८ ते १० दिवस ते अगदी स्वच्छ राहील. त्यावर धुळीचा थर जमा होणार नाही. त्यासाठी नेमकं काय करायचं पाहा..
हा उपाय करण्यासाठी एका भांड्यात थोडं पाणी घ्या. त्यामध्ये मीठ आणि कोणतंही शॉवर जेल घाला. आता या पाण्यात एक कॉटनचा कपडा बुडवा आणि तो घट्ट पिळून त्याने फर्निचर पुसून काढा.
त्यानंतर ओलसर फर्निचर थोडं सुकलं की मग त्यावर अगदी थोडं ऑलिव्ह ऑईल शिंपडून सुती कपड्याने पुन्हा फर्निचर पुसून घ्या.
हा उपाय केल्यास फर्निचर स्वच्छ, चकाचक राहील. त्यावर छान चमक येईल आणि मुख्य म्हणजे पुढे ८ दिवस ते नाही पुसलं तरी त्यावर धुळीचा थर दिसणार नाही.