लादी पुसण्याच्या पाण्यात २ पदार्थ मिसळा! आरश्यासारखी चमकेल घाण झालेली लादी-स्वच्छ दिसेल
Updated:February 12, 2026 23:13 IST2026-02-12T22:41:01+5:302026-02-12T23:13:01+5:30
How To Clean Floor : सगळ्यात आधी एका बादलीत पाणी घ्या. या मिश्रणात अर्धा टिस्पून सैंधव मीठ घाला. यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार शॅम्पूसुद्धा घालू शकता.

लादी पुसण्यासाठी नेहमीच खूपच मेहनत न करता तुम्ही काही सोप्या ट्रिक्स वापरून कमी वेळात आणि कष्टात स्वच्छ, चकचकीत लादी पुसू शकता.
जर तुम्ही फरशी रेग्युलर व्यवस्थित स्वच्छ केली नाही तर फरशीवर पिवळे डाग येतात. फरशी चकाचक साफ करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता. काही सोपे हॅक्स तुमचं काम सोपं करतील.
सगळ्यात आधी एका बादलीत पाणी घ्या. या मिश्रणात अर्धा टिस्पून सैंधव मीठ घाला. यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार शॅम्पूसुद्धा घालू शकता.
शॅम्पूऐवजी हॅण्ड वॉशचा वापर करा. हे मिश्रण पाण्यात घालून फरशी पुसल्यानं फरशीवर सर्व किटाणू मरतील आणि फरशी चांगली चमकेल.
जर फरशीवर डाग लागले असतील तर एका कपात पाणी काढून घ्या. नंतर या पाण्यात बेकींग सोडा मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट फरशीवरच्या डागांवर लावा. चांगला परिणाम दिसण्यासाठी १५ ते २० मिनिटं तसंच ठेवा. नंतर फरशी व्यवस्थित साफ करू शकता.
जर फरशी जास्त घाण असेल तर हलकं गरम पाणी वापरू शकता. गरम पाण्यात कापड बुडवून फरशी पुसून घ्या. नंतर कोमट पाण्यानं फरशी पुसून घ्या. ज्यामुळे किटाणू मरण्यास मदत होईल.