फॅब्रिकचा सोफा स्वच्छ करण्याच्या सोप्या पद्धती- दिवाळीची साफसफाई होईल अगदी झटपट

Updated:October 8, 2025 09:30 IST2025-10-08T09:28:25+5:302025-10-08T09:30:06+5:30

फॅब्रिकचा सोफा स्वच्छ करण्याच्या सोप्या पद्धती- दिवाळीची साफसफाई होईल अगदी झटपट

दिवाळी जवळ आली की घरोघरी स्वच्छता मोहिम सुरू होते. त्या मोहिमेमध्ये सोफा कव्हर तर धुवून स्वच्छ केले जातात. पण जे सोफा फॅब्रिकचे असतात, त्यांच्यावर पडलेले डाग कसे स्वच्छ करावे हे लक्षात येत नाही.

फॅब्रिकचा सोफा स्वच्छ करण्याच्या सोप्या पद्धती- दिवाळीची साफसफाई होईल अगदी झटपट

म्हणूनच या काही साध्या- सोप्या टिप्स पाहा आणि तुमच्याघरचा फॅब्रिकचा सोफा अगदी झटपट स्वच्छ करा.

फॅब्रिकचा सोफा स्वच्छ करण्याच्या सोप्या पद्धती- दिवाळीची साफसफाई होईल अगदी झटपट

फॅब्रिकचा सोफा स्वच्छ करण्यासाठी व्हॅक्युम क्लीनर वापरता आलं तर सगळ्यात उत्तम. कारण त्यामुळे सोफ्यामधली सगळी धूळ, घाण अगदी झटपट स्वच्छ करता येते.

फॅब्रिकचा सोफा स्वच्छ करण्याच्या सोप्या पद्धती- दिवाळीची साफसफाई होईल अगदी झटपट

लिंबाचा रस आणि शाम्पू वापरून सोफ्यावर पडलेले डाग स्वच्छ करता येतात. यासाठी लिंबाचा रस, शाम्पू आणि थोडं पाणी एकत्र करा. त्यामध्ये एक कापड बुडवून हलकं पिळून घ्या. आता त्या कपड्याने सोफ्यावरचे डाग स्वच्छ करा.

फॅब्रिकचा सोफा स्वच्छ करण्याच्या सोप्या पद्धती- दिवाळीची साफसफाई होईल अगदी झटपट

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा हे मिश्रण वापरूनही सोफ्यावर पडलेले डाग स्वच्छ करता येतात.

फॅब्रिकचा सोफा स्वच्छ करण्याच्या सोप्या पद्धती- दिवाळीची साफसफाई होईल अगदी झटपट

व्हिनेगर आणि पाणी एकत्र करा. ते एका स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि सोफ्यावर मारा. यानंतर एखाद्या सुती कपड्याने सोफा पुसून घ्या. सोफा तर स्वच्छ होईलच पण त्यामधून जर दुर्गंधी येत असेल तर ती ही कमी होईल.