1 / 6बऱ्याच मुलांना शाळेत पांढरे सॉक्स घालून जावे लागतात. मुलं मैदानावर खेळतात, मातीत जातात त्यामुळे मग ते सॉक्स लवकर मळतात.(how to clean dirty white socks?)2 / 6ते सॉक्स स्वच्छ धुणं हे एक मोठंच वेळखाऊ काम आहे. कारण कितीही धुतलं तरी त्याचा मळकटपणा काही जात नाही. शिवाय सॉक्सला आपण ब्रश लावून जास्त जोरजोरात घासून धुवू शकत नाही. त्यामुळे मग ते खूपच कळकट दिसू लागतात.(simple tips to clean dirty white socks in 5 minutes)3 / 6म्हणूनच आता हा एक सोपा उपाय पाहून घ्या. हा उपाय केल्यामुळे अगदी कमी मेहनतीत आणि कमी वेळेत सॉक्स चकाचक होतील.4 / 6हा उपाय करण्यासाठी एका बादलीमध्ये थोडं कोमट पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये १ चमचा इनो टाका.5 / 6इनो टाकल्यानंतर १ चमचा कोणतीही वॉशिंग पावडर टाका आणि पाणी हलवून घ्या. आता जो फेस तयार होईल त्यामध्ये सॉक्स ५ ते १० मिनिटांसाठी भिजत ठेवा.6 / 6त्यानंतर हाताने किंवा ब्रशने अगदी हळूवार घासून घ्या. पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. सगळा मळकटपणा जाऊन सॉक्स अगदी नव्यासारखे स्वच्छ होतील.