1 / 7अनेकदा आपण घरातील लाईट ऑन-ऑफ करण्यासाठी स्विच बोर्डला हात लावतो. यामुळे ते लवकर घाण होतात. (switchboard cleaning tips)2 / 7साफ करताना आपल्याला यावर कोणतेही पाणी आणि रसायने वापरता येत नाही. जर आपल्याही घरचे स्विच बोर्डवर काळे किंवा पिवळे डाग पडले असतील तर या सोप्या पद्धतीने साफ करा. (remove stains from switchboard)3 / 7बेकिंग सोड्यामध्ये थोडे पाणी किंवा लिंबाचा रस घालून त्याची जाडसर पेस्ट तयार करा. ब्रशच्या मदतीने स्विच बोर्डवर लावा. काही वेळाने कोरड्या कापडाने पुसून टाका. 4 / 7टोमॅटो सॉसमध्ये डाग काढून टाकणारी अनेक रसायने आहे. सॉस स्विच बोर्डवर १० मिनिटे राहू द्या. यानंतर हलक्या ओल्या कापडाने स्वच्छ करा. 5 / 7टूथपेस्ट किंवा शेव्हिंग क्रीमचा वापर करुन आपण स्विच बोर्ड साफ करु शकतो. यामध्ये ब्लिचिंगचे गुणधर्म आहेत. हे आपण स्विच बोर्डवर ५ मिनिटे राहू द्या. त्यानंतर सुती कापडाने स्वच्छ करा. 6 / 7नेलपॉलिश रिमूव्हरने काही मिनिटांत आपण स्विच बोर्डवरील डाग साफ करु शकतो. परंतु, हे साफ करताना स्विच बोर्डच्या होलमध्ये जाणार नाही याची काळजी घ्या. यामध्ये अल्कोहोल असते ज्यामुळे आग लागू शकते. 7 / 7साबणाने स्वच्छ करता येईल. मायक्रोफायबर कापडावर साबणाचे पाणी लावा आणि ते स्विच बोर्डवर घासून घ्या. यामुळे काही मिनिटांत डाग साफ होतील.