Join us

तांब्या-पितळेची भांडी, दिवे स्वच्छ करण्यासाठी ५ सोप्या ट्रिक- जोर न लावताही भांडी चमकतील नव्यासारखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2025 16:41 IST

1 / 7
दिवाळी येण्यापूर्वीच आपण घराची साफसफाई सुरु करतो. अशावेळी माळ्यावर किंवा घरातील इतर कानाकोपऱ्यात आपल्याला जुनी तांब्या-पितळेची भांडी पाहायला मिळतात. ही भांडी घासताना खूप जोर लावावा लागत असल्यामुळे आपण सहसा वापरत नाही. (brass cleaning tips)
2 / 7
दिवाळीत धनत्रयोदशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी समई किंवा दिवे आपल्याला लागतात. फराळ करताना पितळेची परात किंवा चकलीचा साचा तरी हमखास लागतो. पण वर्षभर याला धूळ लागल्यामुळे याची चमक निघून जाते. काही सोप्या ट्रिक वापरल्यास तांब्या-पितळेची भांडी नव्यासारखी चमकतील. (copper utensil cleaning)
3 / 7
पितळेची किंवा तांब्याची भांडी घासण्यासाठी आपण पितांबरीचा वापर करतो. पण यामुळे आपले हात खराब होतात. अनेकदा त्वचेला संसर्ग होतो.
4 / 7
तांब्याची भांडी साफ करण्यासाठी लिंबाची फोड घेऊन घासा. यात असणारे अॅसिड भांडी चमकवण्यास मदत करतील.
5 / 7
आपण तांब्या-पितळेची भांडी साफ करण्यासाठी लिंबू आणि मीठाचा वापर देखील करु शकतो. यात बेकिंग सोडा घातल्याने भांडी नव्यासारखी चमकतील.
6 / 7
मिठातील सोडीयम आणि लिंबातील सायट्रिक अॅसिड या रसायनांचे मिश्रण होऊन हा पिवळा भाग स्वच्छ चकचकीत होण्यास मदत होईल.
7 / 7
लिंबू आणि मीठाचे मिश्रण १५ ते २० मिनिटे भांड्यांना लावू मग कोमट पाण्याने धुवा. भांडी नव्यासारखी चमकतील.
टॅग्स : दिवाळी २०२५सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स